वाघोलीत गणपती विसर्जन मिरवणुकीत खासदार अमोल कोल्हेंचा सहभाग
महिलांनी केले ढोल ताशा पथकाचे पारंपारिक वेशभूषेत वादन
सुनील भंडारे पाटील
वाघोली (ता.हवेली) येथील शांताराम कटके युवा मंच व अखिल शिवतेज तरुण मंडळाच्या वतीने पारंपारिक वेशभूषेत श्री गणरायाची विसर्जन मिरवणूक संपन्न झाली.
या मिरवणुकीत शिरूर लोकसभेचे खासदार अमोल कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती आकर्षण ठरली. केसनंद फाटा ते वाघेश्वर मंदिर अशी ही मिरवणूक काढण्यात आली. यासाठी लोणीकंद पोलीस स्टेशनच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त तैनात होता .या विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी टाळ,ढोल वाजवत व पताका काठी मिरवत विसर्जन मिरवणुकीचा आनंद घेतला.यावेळी पारंपारिक नऊवारी साडी आणि चष्मा घालून महिला ढोल,ताशा पथक या मिरवणुकीचे विशिष्ट ठरले. वाघोलीतील गणेश भक्तांनी मिरवणूक पाहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. यावेळी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शांताराम कटके,आधारस्तंभ सोमनाथ आव्हाळे, माजी जिल्हा परिषद सदस्या अर्चना कटके, गुलाबराव सातव पाटील, संपत भाऊ जगताप,रोहिदास कटके, मंडळाचे अध्यक्ष अबिद शेख, सागर कड, युवराज दौंडकर संतोष कटके, मुकेश सातव ,चंद्रकांत गाडुते, जितेंद्र कोतवाल, वैभव इंगळे, गणेश तापकीर,अजित देवकर ,अतुल चोरडिया सह इतर कार्यकर्ते मान्यवर उपस्थित होते,