शिक्रापूर : प्रा.एन.बी.मुल्ला
पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांचे वतीने जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून तालुक्याचे आमदार अशोक पवार, तत्कालीन गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर, जिल्हा क्रीडा अधिकारी महादेव कसगावडे आणि श्रीकांत हरणाळे या सर्वांच्या शिफारशीमुळे भांबर्डे येथील न्यू इंग्लिश स्कूलला २ लाख ५० हजार रक्कमेचे क्रीडा साहित्य मिळाल्याची माहिती मुख्याध्यापक मारुती कदम यांनी दिली.
भांबर्डे (ता. शिरूर) येथील न्यू इंग्लिश स्कूलला क्रीडा साहित्य श्री अंबिका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष चांगदेव पिंगळे, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव मारुती कदम, संस्थेचे संचालक हनुमंत पवार आणि ग्रामस्थांच्या हस्ते शाळेस प्रदान करण्यात आले. याप्रसंगी बोलताना संस्थेचे अध्यक्ष चांगदेव पिंगळे यांनी सांगितले की शालेय जीवनातच व्यायामाची सवय लावली पाहिजे. या वयातच भरपूर खेळले पाहिजे.
त्यामुळे शरीराचा शारीरिक आणि मानसिक विकास होत असल्याचेही त्यांनी सांगितले. शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव मारुती कदम यांनी यावेळी बोलताना सांगितले की ग्रामीण भागातील लहान शाळेस प्रथमच ॲथलेटिक्स इक्विपमेंट, बॅडमिंटन, हँडबॉल, हॉलीबॉल, फुटबॉल, मलखांब, लोगोरी, खो-खो, टेनीकोट, चेस, कॅरम, क्रिकेट,इतर साहित्य मिळाले आहे. खेळाचे साहित्य मिळाल्याने विद्यालयातील विद्यार्थ्यांना आनंद झाला असल्याचेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी बाळासाहेब दिवेकर, नानाभाऊ थोरात, रोहिदास इंगळे, लालासाहेब जगताप, सविता शिंदे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि स्वागत क्रीडाशिक्षक उत्तम गाडे यांनी केले तर सुरेश शेळके यांनी आभार मानले,