शिरूर शहराजवळ 17 कमान बायपास येथे शिरूर पोलिसांनी मोठी कारवाई करत सुमारे 650 किलो गोमाऊन्स ( किंमत एक लाख तीस हजार ) जप्त केले
याबाबत शिरूर पोलीस स्टेशन ने दिलेल्या माहितीनुसार 23 रोजी पहाटे ०४:३० वा. सुमारास मौजे शिरूर गावच्या हद्दीत सतरा कमान बायपास येथे १) शाहरुख इसुफ खान, वय २९ वर्षे, गोविंदपुरा मुकुंद नगर ,अहमदनगर २) समीर अब्दुल गणी शेख वय २१ वर्षे हे दोन्ही काळ्या रंगाची स्कॉपिओ नं MH१२ EX ७१५८ यामध्ये सुमारे ६५० किलो अंदाजे गोमांस १,३०,०००रू किमतीचे विक्री करण्यासाठी पुणेवरून - नगर कडे जात आहेत असे कंट्रोल पुणे ग्रामीण ने कळविले असता तात्काळ पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील यांनी १७ कमान पुल शिरूर इथे नाकाबंदी करुन वरील व्यक्तींना पकडण्यात आले व त्यांच्या विरुद्ध कायदेशीर फियाद शिरूर पोलीस स्टेशन ला पोलीस अंमलदार अशोक भगवान चितारे यांनी दिली आहे.सदरची कारवाई ही पोलीस उपनिरीक्षक एकनाथ पाटील,पोलीस अंमलदार विनोद काळे,पोलीस अंमलदार राजेंद्र गोपाळे, पोलीस अंमलदार राजू मांगडे यांनी असून .सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अभिजित पवार हे करत आहे.