शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
भांबर्डे येथील न्यू इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक मारुती कदम यांना कोरोना योद्धा विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
शिरुर तालुका माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ आणि शिरुर पंचायत समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात कदम यांना सन्मानित करण्यात आले. मारुती कदम यांनी कोविड काळात तालुक्यातील सुमारे १२५ पेट्रोल पंपांचे कंट्रोलिंग, प्रवास परवानगीचे पास देण्याच्या प्रक्रियेत ९ हजार लोकांना परवानगी पासेस दिले, शिरुर तालुक्यातील शाळा सुरू करण्यासाठी २ हजार २०० शिक्षक-शिक्षकेतरांची कोरोना तपासणीकामी नोडल अधिकारी म्हणून नेमणूक, तालुक्यातील २ हजार ४५० प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील शिक्षक शिक्षकेतरांचे कोरोना लसीकरण करून घेतले,
विशेष म्हणजे सुरुवातीला माध्यमिक शाळांना लसीकरण करून घेण्याचे धोरण नसतानाही तालुक्यात माध्यमिक विभागासाठी लसीकरण मोहीम राबविली, शिरूर तालुक्यातील गावातील कोरोनाबधित व्यक्ती तपासणी मोहीम राबविण्यासाठी नोडलऑफिसर म्हणून नेमणूक, प्राथमिक आणि माध्यमिक विभाग एकत्र करून २० लाख रुपये कोरोना निधी जमा केला, विविध ठिकाणी कोरोना साहित्य दिले, सर्वात महत्वाचे म्हणजे आरोग्य विभागासाठी रुग्णवाहिका भेट देण्यासाठी नेतृत्व केले. मारुती कदम यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना कोरोना योद्धा विशेष पुरस्कार प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमास राजीव फराटे पाटील, शिक्षणाधिकारी सुनंदा वाखारे, शिरूरचे गटशिक्षणाधिकारी
बाळकृष्ण कळमकर, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नंदकुमार सागर, सचिव प्रसाद गायकवाड, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे
उपसभापती सतीश कोळपे, शिरूर पंचायत समितीचे माजी उपसभापती
राजेंद्र जासूद, उद्योजक ज्ञानेश ढमढेरे पाटील, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष तुकाराम बेनके, कार्याध्यक्ष रामदास थिटे, बाळासाहेब चव्हाण, रामनाथ इथापे, विठ्ठल शितोळे, सोमनाथ भंडारे आदी उपस्थित होते.