अवसरी खुर्द येथे आम आदमी पार्टी मेळावा

Bharari News
0
गावडेवाडी प्रतिनिधी मिलिंद टेमकर
    अवसरी खुर्द (ता आंबेगाव) आम आदमी पार्टी संघटक, कार्यकर्ता मेळावा दिनांक 9/10/22 रोजी अवसरी खुर्द तालुका आंबेगाव येथे संपन्न,   
 या प्रसंगी आम आदमी पार्टीचे पुणे (जिल्हा अध्यक्ष) श्री मुकुंद किर्दत यांच्या हस्ते आंबेगाव तालुका आम आदमी पार्टी कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले, त्यांनी संघटक, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना  अरविंद केजरीवालांच्या मेक इंडिया नं. 1 कॅपेनची माहिती दिली व आज या भडकलेल्या महागाईत दुध दही यावरसुद्धा  टैक्स भरणारया जनतेला शिक्षण  आरोग्य, वीज ,पाणी, रस्ते या मुलभुत  सुविधा मोफत का मिळाव्यात याविषयी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले, तसेच आम आदमी पार्टी महाराष्ट्रातील तालुका पातळीवरील सर्व निवडणूका लढवणार असल्याचे जाहिर केले.
      याप्रसंगी  अक्षय शिंदे सचिव (पुणे जिल्हा), वैभव टेमकर समन्वयक (आंबेगाव तालुका), संजय चव्हाण समन्वयक ( जुन्नर तालुका) अनिल भोर,गणेश टाव्हरे,सयाजी शेवाळे,सालिम इनामदार,नामदेव खिलारी,सुनिल खिलारी,राजेश जाधव (सर),रहेमान इनामदार, अंकुश राठोड, अतुल शेंडे या आंबेगाव, जुन्नर तालुक्यातील कार्यकर्त्यांसोबत खेड चाकण येथील संघटक देखील उपस्थीत  होते. याप्रसंगी .वैभव  टेमकर आंबेगाव तालुका (समन्वयक) यांनी आभार व्यक्त केले व यापुढे  संघटक,कार्यकर्ते पक्षकार्य जोमाने वाढवून देशात आम आदमी पक्षाचे सरकार स्थापन करण्यात मोलाचा वाटा उचलतील हा विश्वास व्यक्त केला,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!