लोणी काळभोर अनिकेत मुळीक
पुणे: सावित्रीबाई फुले विद्यापीठाची पुणे सिनेट निवडणूक पारदर्शक पद्धतीने घेण्यात याव्यात अशी मागणी स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील यांनी प्रभारी कुलगुरू काळे यांच्याकडे निवेदन सादर करून केली आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना स्वाभिमानी ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रोहन सुरवसे पाटील म्हणाले की सावित्रीबाई फुले विद्यापीठ. पुणे सिनेट निवडणुकीत -२०२२ च्या अध्यापक गट मतदार यादीत तात्पुरत्या मान्यता पत्राच्या आधारे ०६ वाढ दिलेली आहे. तदर्थ मान्यता पत्राच्या आधारे स्वतःच्या मर्जीतील व्यावसायिक महाविद्यालयातील प्रशासनाकडून प्रस्तावाच्या आधारे तदर्थ मान्यता घेऊन शिक्षक मतदार यादी अंतिम करण्याचा प्रयत्न चालू आहे.
अध्यापक गटांच्या जागा तात्पुरत्या शिक्षक मान्यता पत्राच्या आधारे बळकावण्याचा प्रयत्न आहे ती नावे तातडीने चौकशी करून वगळण्यात यावीत इत्यादी तक्रारी आमच्या कार्यालयाकडे प्राप्त झाल्या असल्याचे आमच्या निदर्शनास आले आहे. सहा महिने, एक वर्ष कालावधीतील शिक्षक मान्यता पत्राच्या आधारे शिक्षक पाच वर्षांसाठी सिनेट सदस्य निवडून देणे योग्य नाही यादीत केलेली नोंदणी रद्द करावी. विद्यापीठाच्या निवडणुका पारदर्शक पद्धतीने घेण्यात याव्यात. ज्या अधिकाऱ्यांनी या मान्यता पत्राच्या आधारे, शिक्षक मतदार यादी अंतिम करण्याचा प्रयत्न केला आहे त्या अधिकाऱ्यांना तातडीने या निवडणूक अधिकारी पदावरून हटविण्यात यावे. या सर्व मागण्यांना घेऊन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू कारभारी काळे यांना निवेदन देण्यात आले आसल्याचे सांगत याची तात्काळ दखल घेऊन कारवाई करावी अन्यथा स्वाभिमानी ब्रिगेडच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा रोहन सुरवसे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला आहे.यावेळी दिपेश ननावरे, सुनिल कुसाळकर उपस्थित होते.