हवेली प्रतिनिधी सचिन सुंबे
1982 साली साने गुरुजी संस्थेने लोणी काळभोर येथील डोंगर भागातील कोंडे वस्ती येथे पाझर तलाव बांधला होता.सतत पडणाऱ्या परतीच्या पावसाने हा पाझर तलाव कधी नव्हे एवढा भरला. व तो पाणी साठवून फुटण्याच्या मार्गावर असल्याचे ग्रामस्थांनी हवेली तालुका पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी काळभोर यांना सांगताच त्यांनी जेसीबीच्या साह्याने या सांडव्या जवळ थोडेसे उकरून पाणी काढुन दिल्यामुळे लोणी गावात पाणी घुसण्याचा धोका टळला आहे .
यावेळी वनविभागाचे अधिकारी वायकर, उद्योगपती युवराज काळभोर उपस्थित होते . हा पाझर तलाव अतिशय जुना असून तो फुटण्याच्या मार्गावर असल्याचे ग्रामस्थांनी सांगताच जेसीबीच्या साह्याने सांडव्या शेजारी थोडीसे उकरुन पाणी काढल्यामुळे लोणी गावात पाणी जाण्याचा धोका टळला आहे .तसेच वनविभागाच्या जागेत या पाझर तलाव्याच्या वर 36 लहान, मोठे तलाव असून त्यातील एक जरी फुटला असता तरी हा पाझर तलाव फुटला असता त्यामुळे ओढ्या शेजारील घरात व लोणी गावात पाणी घुसले असते त्यामुळे ताबडतोब सांडव्यावरून पाणी काढून देण्यात आले. गावकऱ्यांच्या या निर्णयामुळे त्यामुळे मोठा धोका टळला,