भेसळयुक्त सिमेंट विक्री करणारे दोन आरोपींचा लोणी काळभोर पोलिसांनी केला पर्दाफाश

Bharari News
0
लोणी काळभोर प्रतिनिधी अनिकेत मुळीक
       लोणी काळभोर (ता. हवेली) जिल्हा पुणे,हद्दीतील थेऊर परिसरातील अल्ट्रा टेच (Ultratech Cement)कंपनीच्या सिमेंटच्या पोत्यमध्ये भेसळयुक्त सिमेंट भरून त्याची विक्री करणाऱ्या दोन आरोपी विरुद्ध लोणी काळभोर पोलिसांनी  गुन्हा दाखल केला आहे..     
लोणीकाळभोर पोलीस स्टेशन,पुणे शहर कलम ४१९, ४२० प्रमाणे महेश अर्जुन मुखीया, वय - २७ वर्षे, धंदा नोकरी, रा. सी/०४, दिपाली निवास, कारगील नगर विरार पुर्व पालघर ४०१३०३ (१) प्रविण दिलीप केंगार रा. गायकवाड वस्ती थेऊर फाटा पुणे । (२) सशांत बापराव केंगार रा.सदर दिनांक १८/१०/२०२२ रोजी 3 वा.चे सुमारास व त्या पुर्वी वारंवार शिवरुद्र एंटरप्रायझेस अॅन्ड बिल्डींग मटेरीअल सप्लायर्स थेऊर फाटा ता हवेली जि पुणे येथे दि.१८ रोजी ७:२० वा. ८६४०/- रु किंमतीची अल्ट्राटेक कंपनीच्या सिमेंटची २४ पांढऱ्या रंगाची पोती, त्यावर UltraTech cement असे मोठ्या अक्षरात दर्शनी भागावर लिहीलेले तसेच कोपऱ्यावर NOT FOR RESALE असे लिहीलेले त्याची प्रत्येक पोत्याची किंमत
प्रत्येकी ३६० रु प्रमाणे, प्रत्येकी वजन ५० किग्रॅ. ४५,५७०/- रु किंमतीची श्री कंपनीच्या सिमेंटची १४७ पांढऱ्या रंगाची पोती, त्यावर
shree cement असे मोठ्या अक्षरात दर्शनी भागावर लिहीलेले तसेच कोपऱ्यावर NOT FOR RETAIL SALE असे लिहीलेले त्याची प्रत्येक पोत्याची किंमत प्रत्येकी ३१० रु प्रमाणे, प्रत्येकी वजन ५० किग्रॅ. १०,००,०००/- रु किंमतीची एक महींद्रा मॅगझीमो कंपनीचा मालवाहतुकीचा टेम्पो  नंबर एमएच १२ जी टी ६४०६, ताब्यात घेतला आहे,
पोलिसांनी दिलेल्या माहतीनूसार 
१०,५४,२१०/-रु. किंमतीचा मुद्देमाल
टॉर्क डिटेक्टीव्ह कंपनी, मुंबई येथील कार्यकारी व तपाशी अधिकारी महेश अर्जुन मुखीया, वय - २७ वर्षे, धंदा नोकरी, रा.  दिपाली निवास, कारगील नगर विरार पुर्व पालघर, यांनी अल्ट्राटेक सीमेंट कंपनीने व बीर्ला सुपर सीमेंट कंपनीने त्यांचे उत्पादनामध्ये भेसळ करुन दुय्यम (नकली) व हुबेहुब माल बनवुन बाजारात विक्री करणाऱ्या कंपनी व व्यवसायीका विरुद्ध पोलीस मदत घेवुन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे दि.२६/०९/२०२२ रोजीच्या अधिकारपत्राद्वारे फिर्याद दिली की, दि.१८/१० |२०२२ रोजी 3 वा. चे सुमारास व त्यापुर्वी वारंवार इसम  प्रविण दिलीप केंगार रा. गायकवाड वस्ती थेऊर फाटा पुणे व सुशांत बापुराव केंगार रा. सदर हे त्यांचे मालकीचे शिवरुद्र एंटरप्रायझेस अॅन्ड बिल्डींग मटेरीअल सप्लायर्स थेऊर फाटा ता हवेली जि पुणे या दुकानामध्ये स्वतःचे आर्थिक फायद्यासाठी अल्ट्राटेक व श्री कंपनीचे सिमेंटची विशिष्ठ पोती ही विक्री व साठवणुक करण्यास मनाई असताना देखील (NOT FOR RESALE, NOT FOR RETAIL SALE) त्याची स्थानीक पातळीवर विक्री करुन शासनाची व लोकांची दिशाभुल करुन फसवणुक करत असल्याचे निदर्शनास आल्याने माझी त्यांचे विरोधामध्ये अल्ट्राटेक सीमेंट लि. (ग्रासीम इ. लि.) कंपनी व बीर्ला सुपर सीमेंट कंपनी यांच्या वतीने कायदेशी तक्रार आहे. वगैरे मजकुराची फिर्याद दिल्याने वरील प्रमाणे गुन्हा दाखल आहे. | वैभव मोरे, पोलीस उप निरीक्षक लोणीकाळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर | अमोल घोडके, पोलीस उप निरीक्षक लोणीकाळभोर पोलीस स्टेशन पुणे शहर, पुढील तपास करत आहेत,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!