सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
लडकतवाडी (ता दौंड) येथे कुणीतरी शिकारीसाठी लावलेल्या पिंजऱ्याचे तारांमध्ये पंजा अडकून बिबट्याचा मृत्यु गावाच्या बांधावर अज्ञात व्यक्तीने शिकारीसाठी लावलेल्या लोखंडी साखळी जोडलेला पंजात अडकुन बिबट्याचा तडफडून मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली .
या अडचणीच्या परिसरात काटेरी दाट झाडं झुडपात शेतकरी नागरिकांची वर्दळ व जाणे येणे दुर्मिळ असते . मात्र या ठिकाणी बिबट्या मेल्याची माहिती गोपालक राजस्थानी व्यक्तींनी ग्रामस्थांना दिली, क्षणात ही खबर गावभर पसरली, पत्रकारांनी दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती कल्याणी गोडसे यांना संपर्क साधुन सदर घटनेची खबर दिली . यवत येथील वनपाल सचिन पुरी यांनी येवून पडताळणी करुन पुणे सहाय्यक वनसंरक्षक दिपक पवार यांना खबर देता वनसंरक्षक पदाधिकारी पथकासह घटनास्थळी दाखल झाले . राहू येथील सरकारी पशुधन विकास अधिकारी अनिल इंगवले यांनी तपासणी करुन अंदाजे ८ दिवसापूर्वी ही घटना घडली असावी असा अंदाज दर्शविला . पुणे सहाय्यक वनसंरक्षक, वनपरिक्षेत्र दौंड पथकाने परिसरात शेतकऱ्यांना विचारपुस केली असता गाई चारण्यासाठी याठिकाणी गेलेल्या राजस्थानीला वाघाचे धुड पडलेले दिसले होते . लडकतवाडीच्या सरपंच सौ लडकत, पोलीस पाटील राजेंद्र जगताप व गावातील अनेक शेतकरी ग्रामस्थ मोठ्या संख्येने मृत बिबट्या पाहण्यास उपस्थित होते .उंडवडी लडकतवाडी परिसरात गेली अनेक महिन्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातला होता, अनेक शेतकऱ्यांचे शेळ्या मेंढ्या जनावरे हल्ला करून मारले आहेत, त्यामुळे शेतकरी वर्ग भयभीत झाला होता .बिबट्या मृत पावल्याचे समजताच पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती . मागणी केल्यानंतर पिंजरा लावला असता तर कदाचित मृत्यू झालेला बिबट्या जिवंत राहिला असता अशीही प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली . पुणे विभाग वनसंरक्षण सहाय्यक दीपक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली दौंड वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती कल्याणी गोडसे,वनपाल सचिन पुरी , वनरक्षक नानासाहेब चव्हाण पिंपळगाव, वनरक्षक श्रीमती सुनिता शिरसाट वाळकी, वन मजूर रमेश कोळेकर ,विलास होले ,सुरेश पवार नौशाद शेख या वेळी घटनास्थळी प्रामुख्याने उपस्थित होते .सदर मृत पावलेल्या बिबट्याचे शव पिंपळगाव येथील वनक्षेत्रामध्ये दहन करून विल्हेवाट करणार असल्याचे सांगण्यात आले, याबाबतीत पुढील तपास सुरू असल्याचे सहाय्यक वनसंरक्षक दीपक पवार यांनी सांगितले .