उरुळी कांचन प्रतिनिधी सचिन सुंबे
उरुळी कांचन (तालुका हवेली) येथील शिंदवणे घाटात पिकअप गाडी वळणावर पलटी होऊन भीषण अपघात घडला असून, या अपघातात तेरा जण गंभीर जखमी झाले आहेत, त्यापैकी तीन जणांची प्रकृती गंभीर आहे,
शिंदवणे घाट दिवसेंदिवस बनत चाललाय मृत्यूचा सापळा, या ठिकाणी आत्तापर्यंतच्या कालावधीत अनेक लहान-मोठे अपघात घडले, आज एक पिकप गाडी जेजुरी कडून संभाजीनगर कडे घाट उतरत असताना धोकादायक वळणावर पिकप गाडी पलटी झाली, त्यामध्ये एकूण 13 जण जखमी झाले असून त्यांना उरुळी कांचन येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यापैकी तीन जणांची प्रकृती चिंताजनक आहे, शिंदवणे घाटामध्ये आत्तापर्यंत वेडी वाकडी वळणे, तीव्रत चढ उतार यामुळे अनेक अपघात घडले, अनेकांना आपले जीव गमवावे लागलेले आहेत, या घाटामध्ये काही अपघाताचे स्पॉट बनले आहेत, घाटामध्ये वारंवार अपघात घडत आहेत, मात्र संबंधित खात्याचे याकडे दुर्लक्ष आहे, अजून किती अपघात लोकांना पहावे लागणार आहेत, असा गंभीर प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे, संबंधित खात्याने व शासनाने तातडीने शिंदवणे घाटातील अपघाताचे स्पॉट दुरुस्त करावे अशी मागणी नागरिकांकडून होत आहे,