लोणी काळभोर प्रतिनिधी अनिकेत मुळीक
हवेली तालुक्यातील लोणी काळभोर वाहतूक कोंडीचा अनेक दिवसांचा प्रलंबित प्रश्न अखेर सुटला.. लोणीकाळभोर गावामध्ये आठवडा बाजार हा दर शनिवारी या दिवशी भरला जातो..हा बाजार फक्त लोणी काळभोर गावा पुरताच मर्यादित न राहता आजू बाजूच्या गावातील लोकांना देखील लोणी काळभोर बाजाराचा मोठ्या प्रमाणात फायदा होत असतो.
शेतकरी, ग्राहक तसेच व्यापारी वर्गाला वाहतूक व्यवस्थेतील अव्यवथेचा नाहक त्रास सहन करावा लागत होता.रस्त्यावर मांडलेली दुकाने,या मुळे या भागात मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत असे आपत्कालीन घटना घडल्यास रस्ता मोकळा असावा लागतो. हिच वाहतूक कोंडी अनेक दिवसांपासून तसून न तशी असल्याने लोणी काळभोर ग्रामपंचायत सदस्य व कर्मचारी तसेच पोलिस अधिकारी यांच्या समन्वयक कार्यातून आज शनिवार दिनांक १५ रोजी व्यवस्थापण करण्यात आले.या बाबतीत ग्रामपंचयतीने जाहीर आव्हानं केले होते की.
*जाहीर आवाहन*
लोणी काळभोर व परिसरातील सर्व ग्रामस्थ व नागरिकांना कळविण्यात येते की आठवडा बाजारा करिता आलेल्या व्यापारी, शेतकरी तसेच ग्राहक ,नागरिक यांनी आपली वाहने लोणी फाटा ते दत्त मंदिर चौकात पर्यंत असणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर उभी करू नये .
पार्किंगची सुविधा मराठी जिल्हा परिषद शाळेसमोरील मोकळ्या जागेत तसेच वनविभागाच्या कार्यालयासमोरील मोकळ्या जागेमध्ये करण्यात आलेली आहे तरी आपण आपली वाहने सदर ठिकाणी पार्किंग करावी
लोणी फाटा ते दत्त मंदिर चौक पर्यंतच्या रस्त्यावर वाहने पार्क केल्यास पोलिस विभागातर्फे योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल याची सर्वांनी नोंद घ्यावी....जरी ग्रामपंचायत तसेच पोलिस अधिकाऱ्यांनी याचे व्यवस्थापन जरी केले असेल तरी ग्राहक तसेच व्यापारी वर्गाने देखील याचे काटेकोर पणे पालन करणे आवश्यक आहे..या वरती जाब बसण्या साठी ग्रामपंचायत तसेच पोलिस अधिकाऱ्यांनी लक्ष्य घालावे...नाही तर हे फक्त तात्पुरते समाधान होऊ नये असा प्रश्न जनसामान्य चा मनामध्ये येतो..या कार्य बद्दल लोणी काळभोर ग्रामपंचायत, पोलिस अधिकारी,सदस्य व कर्मचारी वर्ग यांचे सगळी कडे आभार व्यक्त केले जात आहे...