आळंदी प्रतिनिधी आरिफ भाई शेख
आळंदी देवाची दिनांक 27 आळंदी पोलीस स्टेशन येथे वर्दीतील माणसाची एक दिवाळी हा अनोखा दिवाळीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाची संकल्पना आळंदीतील सामाजिक कार्यकर्ते आरिफ भाई शेख यांची होती पोलीस खात्याला दिवाळीचा मोठा सण हा कुटुंबाबरोबर साजरा करता येत नाही आणि त्यांनाही भावना आहेत या समजून घेण्यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणून दिवाळी ही आपण आपल्या अंगणात जशी फटाकडे फोडून साजरी करतो तशा प्रकारचा आनंद मिळावा यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,
आळंदी पोलीस आणि आळंदी नगरपरिषद सफाई कर्मचारी यांना यात समावेश करण्यात आले होते आळंदीचे माजी नगरसेवक प्रकाश कुऱ्हाडे पाटील यांनी या कार्यक्रमाला विशेष अशी उच्चांकी स्वरूप प्राप्त करून दिले प्रकाश कुराडे यांनी सर्व सफाई कामगारांना साड्यांचे वाटप करून याच कार्यक्रमात भाऊबीज साजरी केली या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती म्हणून माननीय भोसले पाटील, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस प्रतिनिधी संदीप नायकरे पाटील,आळंदी विकास युवा मंच नंदकुमार वडगावकर, काँग्रेस कमिटी आनंदराव मुंगशी,माजी नगरसेवक अनिकेत कोराडे पाटील, सरवली ग्रामपंचायत उपसरपंच आळंदीतील मान्यवर पोलीस कर्मचारी महिला पोलीस कर्मचारी सफाई कामगार महिला पुरुष आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते याच कार्यक्रमांमध्ये पत्रकार एम डी पाखरे यांच्या प्रामाणिकपणा बद्दल त्यांचा विशेष सत्कारही क्राईमचे पीएसआय रमेश पाटील साहेब यांच्या हस्ते आणि डीडी भोसले पाटील यांच्याशी भारतीय आळंदी पोलीस स्टेशन येथे करण्यात आला या कार्यक्रमात डीडी भोसले पाटील प्रकाश कुऱ्हाडे पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले मनोगत व्यक्त करत असताना आरिफ भाई शेख हे आळंदीतील आमचे सहकारी मित्र यांनी सदरच्या कार्यक्रमाचे नियोजन करून एक चांगली संकल्पना समाजापुढे उभे केली असे मत मांडले त्याबरोबर डीडी भोसले पाटील यांनी आपल्या भाषणात सांगताना असे सांगितले की आळंदी भूमीमध्ये आळंदी पोलीस स्टेशन आणि आम्ही गावकऱ्यांनी येथे कधी जातीय ते निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण होऊन दिले नाही ही आळंदीची विशेष नोंद घेण्याची गोष्ट आहे कार्यक्रमाचे आभार संदीप नाईकरे पाटील काँग्रेस कमिटी सदस्य यांनी मानले