अतिवृष्टीमुळे राज्यभरात शेतकर्यांची अतोनात नुकसान झाल्यामुळे बळीराजा हतबल आहे आणी मुख्यमंत्री उत्सवात फिरत आनंदोत्सव साजरा करत आहेत , लोकांना सध्याचे सरकारमध्ये कृषीमंत्री कोणयत हेही माहीत नाहीत आणि जे कुणी अब्दुल गद्वार म्हणुन मंत्री आहेत त्यांना शेतीतले काही कळत नाही त्यामुळे शेतकर्याचे अश्रू पुसत धिर देत नुकसान भरपाई देण्यासाठी हा उद्धव साहेबांचे आदेशानुसार शिरूर तालुक्यातील मलठण, वाघाळे, गणेगाव,आदी गावांचे पहाणी दौऱ्यात युवासेनाप्रमुख माजी पर्यावरणमंत्री आदीत्य ठाकरे यांनी मलठण येथे शेतकरी भेटीत सुतोवाच केले .
नाशिक येथून पुणे जिल्ह्यातील ढगफुटी व अतिवृष्टीग्रस्त गावभेटीवेळी त्यांचे समवेत विधानं परिषदेचे विरोधी पक्षनेते रावसाहेब दानवे ,शिवसेनेचे संपर्कप्रमुख माजी राज्यमंत्री सचिन आहेर ,पुणे जिल्हा शिवसेनाप्रमुख ज्ञानेश्वर कटके , तालुका प्रमुख राजाराम बाणखेले ,शिरूर आंबेगाव विभाग जिल्हाप्रमुख सुरेश भोर, उपजिल्हा प्रमुख पोपट शेलार, उपनेते अविनाश रहाणे , उपजिल्हा प्रमुख संजय देशमुख , विभागीय संघटक अनिल पवार , किरण देशमुख , तालुका प्रमुख गणेश जामदार , उप तालुकाप्रमुख अमोल हरगुडे, माजी ता . प्रमुख मच्छिंद्र गदादे , पंचायत समिती सदस्य डॉ . सुभाष पोकळे, माजी तालुकाप्रमुख अनिल वडघुले , कैलास भोसले , जातेगावचे माजी सरपंच समाधान डोके, इनामगावचे शिवाजी मचाले, शिरूर शहर प्रमुख सुनिल जाधव , मलठणचे मा सरपंच सुरेश गायकवाड , व परीसरातील शेतकरी मोठ्या संख्येने बाजारतळ येथील भेटमेळाव्यात उपस्थीत होते . प्रास्तावीकात राजाराम बानखेले यांनी अतिवृष्टीमुळे शेतकरी भुकेकंगाल झालेने व्यापारीवर्गही धंदा न झाल्याने तोट्यात आहे. कोरोनो काळात मुख्यमंत्री उद्धवजीनी २ वर्ष परीस्थीति संयमाने हाताळली नसती तर हे
गद्दार खोके खायला जिवंतच नसते असे सांगीतले .
आदित्य ठाकरे यांनी कृषीमंत्री कोण नाव सांगा विचारता पब्लिकमधून कुणीतरी अब्दुल गद्दार म्हणता हशा पिकला . शेतकऱ्याने खचून जाऊ नये आम्ही तुमच्या पाठिशी आहोत असा धीरही त्यांनी शेतकरी बांधवांना दिला . यावेळी मलठण, टाकळी हाजी , पिंपरी दुमाला गावचे शेतकर्यांनी निवेदने दिली . विशेष म्हणजे आदित्य ठाकरे हे शिवरायांचे प्रतिमेस हार घालण्यापुरतेच स्टेजवर गेले बाकी सारा संवाद त्यांनी खाली शेतकर्यांचेमधे बसून साधला . सुत्रसंचलन रोहीदास खेडकर यांनी केले,