कोरेगाव भीमा ग्रामस्थांचे अनोखे आंदोलन- कचरा टाकणारे व्यक्तीला उचलायला लावला कचरा - पहा व्हिडिओ

Bharari News
0

सुनील भंडारे पाटील

            कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) येथील भीमा नदीवरील पुलाच्या दोन्ही बाजूच्या टोकाला विचित्र स्वभावाच्या व्यक्ती सर्रास कचरा टाकत आहेत, अशा एका व्यक्तीला पकडून त्याला टाकलेला त्याचा कचरा उचलायला लावले, त्याची गोड भाषेत चांगलीच कान उघाडणी केली,      
पुणे नगर महामार्गावर ब्रिटिश कालीन अतिशय सुंदर असे दगडी बांधकामांमध्ये बांधलेला पूल भीमा नदी तीरावर दोन्ही बाजूला असलेले निसर्गसौंदर्य प्रवाशांचे व नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे, परंतु गेल्या अनेक वर्षांपासून काही नास्तिक लोक येथील सौंदर्याला गालबोट लावत आहेत, रस्त्यावरून प्रवास करत असतानाच कचऱ्याच्या बॅगा पुलाच्या दोन्ही बाजूला लाज सोडून फेकल्या जात आहेत, कोरेगाव भीमा आणि पेरणे ग्रामस्थांनी अनेक वेळा आवाज उठून त्याचप्रमाणे दोन्ही गावच्या ग्रामपंचायती सारख्या कचरा उचलून साफसफाई करत आहेत, साफसफाई केली की चार दिवसात काही नास्तिक लोक कचरा या ठिकाणी टाकत आहे, यामुळे निसर्ग सौंदर्य तर धोक्यात आलेच असून लोकांच्या आरोग्याला धोका आहे,          
काल अशाच एका बिनलाजी व्यक्तीला ग्रामस्थांनी पकडले, त्यांनी टाकलेला कचरा त्याला उचलायला लावला आणि चांगल्या गोड भाषेत त्याला समज देण्यात आली, संबंधित व्यक्ती हा खराडी येथील रहिवासी असून तो सणसवाडी येथील कंपनीमध्ये कामास आहे, कामावर जाताना त्याने बॅगेत आणलेला कचरा या ठिकाणी टाकला, त्याला गावांमधील पै,तानाजी ढेरंगे, मानिक गव्हाणे,सभांजी ढेरंगे, शकीलभाई ईनामदार, के .डी.गव्हाणे पत्रकार, दिलीप काबंळे,व ग्रामस्थांनी पकडले त्यांनी टाकलेला कचरा त्याला उचलायला लावला, आणि चांगल्या भाषेत समज दिली, ग्रामस्थांच्या या स्टिंग ऑपरेशन बद्दल कौतुक होत आहे,         
यापुढे देखील कोरेगाव भीमा ग्रामस्थांकडून अशा स्वरूपाचे स्टिंग ऑपरेशन करून पुलाच्या ठिकाणी कचरा टाकणारे व्यक्तींना पकडून कडक शिक्षा देण्यात येईल असे ग्रामस्थांनी सांगितले आहे, महामार्गावर प्रवास करणाऱ्या व्यक्तींनी या ठिकाणी कचरा टाकू नये आणि सहकार्य करावे असे आवाहन कोरेगाव भीमा, पेरणे ग्रामस्थांनी केले आहे,          
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!