सुनील भंडारे पाटील
एफ आर पी दिल्याशिवाय राज्यात तसेच पुणे जिल्ह्यात साखर कारखान्यांना ऊस गाळपाचे परवाने देऊ नये अशी मागणी रयत शेतकरी संघटनेच्या वतीने सहकार साखर आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे,
चालू वर्षी अति प्रमाणातील पाऊस तसेच हवामानाचे बदल यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे, त्यात गतवर्षीच्या हंगामातील एफ आर पी रक्कम शेतकऱ्यांना पूर्णपणे देण्यात आलेले नाही, ती दिल्याशिवाय साखर कारखान्यांना चालू वर्षाच्या गळीत हंगामामध्ये गाळप परवानगी देऊ नये, राज्यामध्ये सध्या ऊसाची मोठ्या प्रमाणात उपलब्धता असल्यामुळे गाळप हंगाम सुरू करण्यास राज्यातील अनेक साखर कारखान्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत, बऱ्याच साखर कारखान्यांनी ऊस गाळपाची ऊस उत्पादक शेतकऱ्याची पूर्णपणे रक्कम अदा केलेली नाही, शेतकऱ्यांना देणे वेळेत न दिल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले आहे,
तातडीने त्यांची रक्कम देण्यात यावी, राज्यातील सर्व कारखान्यांना शेतकऱ्यांचे देणे देण्याचे आदेश व्हावेत, राजकीय दबाव पोटी शेतकऱ्यांची देणे न दिली गेल्यास साखर कारखान्यांचे गाळप परवाने रद्द करण्यात यावेत, याबाबतीत योग्य निर्णय न झाल्यास रयत शेतकरी संघटनेतर्फे तीव्र स्वरूपाचे आंदोलन उभारले जाईल असा इशारा लेखी निवेदनाद्वारे रयत शेतकरी संघटनेने दिल्याचे संघटना प्रदेशाध्यक्ष बापूसाहेब देशमुख, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष रामदास कोतवाल यांनी सांगितले,