सुनील भंडारे पाटील
तळेगाव ढमढेरे (तालुका शिरूर) येथे न्हावरेला जाणाऱ्या रस्त्यावर गावामध्ये राजकीय छाप असणाऱ्या, धन दांडग्या लोकांनी मनगटशाहीच्या जोरावर वाहतुकीत अडथळा आणत रस्त्यावर अतिक्रमण करून कमर्शियल गाळ्यांचे काम केले आहे,
याबाबतीत स्थानिक नागरिकांच्या अनेक तक्रारी होत असून सहाय्यक अभियंता श्रेणी एक सार्वजनिक बांधकाम उपविभाग शिरूर यांनी अतिक्रमण काढण्याबाबत लेखी आदेश संबंधित व्यक्तीना दिले आहेत , गावांमधील न्हावरे गावाला जाणाऱ्या रस्त्यावर संबंधितानी अतिक्रमण करत व्यावसायिक गाळे यांचे काम सुरू केले, ऐन दीपावली सणाच्या कालावधीत कामाचा वेग वाढवून रात्रंदिवस काम करून हे काम पूर्ण करून घेतले, परंतु अतिक्रमणात झालेले या कामामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे, तसेच अपघाताची शक्यता देखील नाकारता येत नाही, या अतिक्रमणाविषयी गावातील काही नागरिकांनी, ग्रामपंचायत,तहसीलदार, पीडब्ल्यूडी, पुणे जिल्हाधिकारी, यांच्याकडे लेखी तक्रारी केलेले आहेत, सदर अधिकाऱ्यांनी कारवाई करत संबंधित अतिक्रमण धारकाला अतिक्रमण काढून टाकण्याचे आदेश दिलेले आहेत, परंतु प्रशासनाच्या या आदेशाला झुगारून अद्याप अतिक्रमण हटवले गेले नाही, अतिक्रमण करून गाळे बांधणाऱ्या व्यक्तींमध्ये राष्ट्रवादी व बीजेपी मधील पदाधिकाऱ्यांचा समावेश असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे, त्यामुळे याबाबतीत प्रशासन काय पाऊल उचलते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे,
याबाबतीत सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकाऱ्यांनी सांगितले की अतिक्रमण धारकांना नोटीस बजावण्यात आलेल्या असून , लवकरात लवकर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यासाठी अतिक्रमणधारकांबरोबर, सरपंच/ ग्रामसेवक ग्रामपंचायत तळेगाव ढमढेरे, पोलीस निरीक्षक शिक्रापूर पोलीस स्टेशन यांना लेखी स्वरुपात आदेश काढण्यात आला आहे,