प्रतिनिधी सचिन सुंबे
उरुळी कांचन ग्रामपंचायततर्फे सोमवारपासून (ता.३१)घरपट्टी व पाणीपट्टीची थकीत असलेल्या नागरिकांच्या घरासमोर बँड वाजून वसुली करण्यात येणार असल्याचे तसेच घरपट्टी पाणीपट्टी थकित खातेदारांची नावे सार्वजनिक ठिकाणी, ग्रामपंचायत कार्यालय बाहेर, फ्लेक्स द्वारे लावण्यात येण्याचे ग्रामपंचायत तर्फे जाहीर केले होते. अशी माहिती ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस यांनी दिली.
परंतु ग्रामपंचायतीमार्फत ढोल ताशे न वाजवता व सार्वजनिक ठिकाणी थकीत खातेदारांची नावे जाहीर न करता रीतसर वसुली करण्यात येणार असल्याचे डोळस यांनी सांगितले. याबाबत उरुळी कांचन परिसरातून या वसुली फंडाचा संपूर्ण निषेध करून ग्रामपंचायतीच्या कारभाराविषयी आश्चर्य व्यक्त केले जात आहे. जर एखाद्या खातेदाराच्या घरी जाऊन ढोल ताशे वाजवून त्याची मानसिक हानी केली व हेरेशमेंट केली. आणि पुढे काही अघटिक घडले तर याला जबाबदार कोण? असा प्रश्न उरुळी कांचन येथील ग्रामस्थ करत आहेत.
याबाबत उरुळी कांचन येथील माजी उपसरपंच जितेंद्र बडेकर यांनी सांगितले की गावात कसलेल्याही प्रकारच्या सोयी सुविधा मिळत नसून जर असा फतवा काढला आणि एखाद्याला अपमानास्पद वाटले तर त्या नागरिकांनी माझ्याशी संपर्क करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा ग्रामपंचायत अधिनियम कायद्यात असला कुठलाही अधिकार ग्रामपंचायतला नाही. ग्रामपंचायत यांनी नोटीस देऊन कायदेशीर कारवाई करू शकते पण अशा प्रकारचे ढोल वाजवणे वगैरे म्हणजे रीतसर हेरेशमेन्ट , बदनामी व मानसिक हानी त्या व्यक्तीची होऊ शकते .त्यामुळे अशी कुठे घटना घडली तर यासाठी मानवी हक्क आयोगाकडे दाद मागणार असल्याचे जितेंद्र बडेकर यांनी सांगितले.