सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
शिरूर तालुक्यातील जांबूत येथे बिबट्याचे हल्यात मुत्युमुखी पडलेल्या पुजा भगवान नरवडे या तरुणीच्या दशक्रियेत स्वतः ५१ हजाराची मदत देत सर्वांनाच पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर या परीवारास मदत करणेचे आवाहन केले . मयतीचे वेळीच दिलीप वळसे पाटील, पोपटराव गावडे यांचे मार्ग दर्शनाखाली २० लाखाची मदत जांबूत ग्रामस्थांचे प्रयत्नातून शासनाकडून मिळाली . सरपंच दत्ता जोरी, माजी सरपंच बाळूकाका फिरोदिया, सोसायटीचे अरुण कदम, युवानेते दादाभाऊ फलके व सर्वच जांबुत ग्रामस्थांनी सहवेदना प्रगट करत भरघोष आर्थिक मदत केली . मुलीचे वडील भगवान नरवडे हे हामाली करून उपजिवीका करताना १२ वीला ८६ % मार्क असलेल्या या गरीबाचे हुशार मुलीला जांबुत वासीयांनी नेहमीच मदत केल्याचे मा संरपंच फिरोदिया यांनी श्रद्धांजली वहाताना सांगीतले,
मुलीचं कलेक्टर व्हायचं स्वप्न बिबट्याच्या झडपेत मृत झालं म्हणून आप्तेष्ट व परीसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे आणि नियतीचा योगायोग असा की पुजाचे आजी राधाबाई सिताराम नरवडे यांचाही दहा दिवसांपुर्वी मृत्यु झालेने आजी नातींचा दशक्रियाविधी एकत्रच पार पडला यावेळी संरपंच बंडू पुंडे , सभापती विश्वास कोहकडे व प्रवचन सेवा केलेल्या खेडकर ताई यांनीही श्रद्धाजंली वाहीली उपसरपंच दिपक तळोले यांनी सुत्रसंचलन करताना उपस्थितांचे दुखाःत सहभागी होत मदत केल्याबद्दल आभार मानले,