सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
शिरूर तालुक्यातील दुष्काळ ग्रस्त दुर्गम भागात कान्हूर मेसाई सविंदणे रोडलगत मिडगुलवाडी हदीत कृषी पदवीधर जोडप्याने उभारलेल्या लघुउद्योगात ढग फुटीसारख्या जोरदार पावसाचे डोंगर बाजुने आलेले पाणी घूसून शेडभर पसरले,
दुसरीकडे पेरू, डाळींब व सिताफळाचे बागा उपळून फळझड झाली व सिताफळाला अतिवृष्टीमुळे बारच निघाला नसल्याने लाखोंची हानी झाल्याचे प्रगतीशिल शेतकरी व उद्योजक अमित मिडगुले याने दाखविले . मोठ्या पगाराची . नोकरी सोडून कोणतेही शासकीय अनुदान न घेता डोंगराळ भागात ज्ञानयोग ' नावानेअगरबतीचा कारखाना उभारला,
पुढे कोरोनाकाळात बंदमुळे मिझोरामचे कामगार गावी गेले . न डगमगता बिकट स्थितीतही कारखाना चालु ठेवला . अगरबती हा तसा किचकट व कमी मार्जीन असलेला व्यवसाय आहे, तरी मार्केटिंगसाठी मोठी १००१ बक्षीस योजना राबवित तोटा अनुभवला व आता या निसर्गाचे रुद्रावतारामुळे अगरबती कारखाना व फळबागा धोक्यात आल्याने शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांची मागणी आहे .