आंबेगाव प्रमिला टेमगिरे
साकोरे (तालुका आंबेगाव) येथे हर घर नल, हर घर जलं जल जीवन मिशन योजने अंतर्गत साकोरे ता आंबेगाव जि पुणे येथे ‘हर घर नल, हर घर जल’ या योजनेच्या बिद्रवाक्याप्रमाणे पाणी पोहचविण्याकरीता नवीन कामाचा शुभारंभ करण्यात आला अशी माहीती सरपंच अशोक मोढवे यांनी दिली,
ग्रामपंचायत कार्यालयातील सभागृहात गावात नवीन काम सुरु करण्यासाठी जीवन मिशन कार्यक्रमांतर्गत कामासंदर्भात आढावा बैठक सरपंच मोढवे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला पंचायत समितीचे पाटील रावसाहेब व गावातील पाणी पुरवठा समितीचे सदस्य संदिप मोढवे विजय लोहोटे प्रविण मोरे विश्वनाथ बिडकर मंगलताई वायाळ मंगलताई लोहोटे यांची उपस्थित होती.
मोढवे म्हणाले की, जल जीवन मिशन योजने अंतर्गत गावातील प्रत्येक घरात पाणी पुरवठा होण्याकरीता सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी योजना यशस्वीरित्या राबविण्याकरीता समन्वयाने काम करावे. या योजनेकरीता केंद्राकडून आवश्यक निधी उपलब्ध झाला असून गावांमध्ये जल जीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा कसा करता येईल हे पहावे, तसेच पाटील रावसाहेब यांनी वॉटर ट्रिटमेंट प्लांटची माहिती दिली. त्याचबरोबर पाणी पुरवठा संदर्भात यापुढे वेळोवेळी समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे व त्या माध्यमातुन गावातील पाणी पुरवठा सुरळीत करण्याकरीता प्रयत्न होतील असं ग्रामपंचायत सदस्य अनिल गाडे यांनी सांगितले यावेळी माजी उपसरपंच विजय मोढवे हनुमंत गाडे सखाराम वायाळ तसेच पाणीपुरवठा कामाचे ठेकेदार कैलास भोर आदी उपस्थित होते