शिक्रापूर : प्रा.एन.बी.मुल्ला
शिक्रापुर येथील विठ्ठल मंदिरात कोजागीरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा नित्य नेम काकड आरती दररोज पहाटे चार ते सकाळी सव्वा सात यावेळेत उत्साहात सुरु आहे.
शिक्रापूर (ता.शिरुर) येथील काकड आरतीमध्ये वारकरी सांप्रदाय मालिकेतील सर्व विषयांना स्पर्श करत आनंदाने भक्तीने उत्साहात उद्घोष चालू असतो. काकड आरती मंडळ धार्मिक परंपरा टिकविण्याचे काम अखंडीत आणि अविरत उत्साहात करते. या काकड आरतीसाठी पुजारी बाळासाहेब शेंडे, हार्मोनियम वादक तसेच कल्पवृक्ष महिला भजनी मंडळ व अखिल विश्व वारकरी परिषद शिरुर तालुका अध्यक्षा मनिषा धुमाळ, बाबुराव साकोरे, विजय मांढरे, अनिल गायकवाड, सुरेश मांढरे, संजय करंजे, अशोक महाजन, विठ्ठल काळोखे, बाळु गायकवाड, चंद्रकांत राऊत, कुंडलिक खेडकर, बाळु दाते, बाळासाहेब चव्हाण, वामन सासवडे, वामन मांढरे, कोळपकर, गणेश सासवडे, दिपक करंजे, सुरेश थिटे, जगन्नाथ वाघोले, काशिनाथ वाघोले, राजु वाघोले, मंगेश कुलकर्णी, सुरेखा मांढरे, रेणुका थिटे, मनिषा करंजे, निता थिटे, रंजना राऊत , सुरेखा खरपुडे, अरुणा सायकर, हौसाबाई सायकर, संगिता गायकवाड, इंदु गायकवाड, कमल महाजन, ज्योती महाजन, उषा सांडभोर तसेच अनेक भाविक सात्यत्याने उपस्थित असतात.