सासवड :प्रतिनिधी : बापू मुळीक
.. पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी ५० ते ६० एकर जागेत छत्रपती संभाजी महाराजांचे सृष्टी स्मारक उभे रहाणार असून या स्मारकात छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती संभाजी महाराज, शूरवीर जिवाजी महाले,शिवाजी काशीद आणि हिंदवी स्वराज्याच्या उभारणीसाठी ज्या इतिहास पुरुषांनी बलिदान केले अशा महापुरुषांचे चरित्रे व स्मारक निर्माण करणार असल्याचे पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी सांगितले .
पुरंदर तालुका नाभिक संघटनेच्या वतीने शिवरत्न जिवाजी महाले यांची ३८७ वी जयंती उत्सव व समाजभूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार संजय जगताप बोलत होते.ते पुढे म्हणाले छत्रपती शिवाजी महाराजांची स्वराज्याची पहिली लढाई पुरंदर मधील बेलसर मध्ये झाली.प्रतापगडावर अफजलखान वधाने छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य जगासमोर आले. या लढ्यात जिवाजी महाले यांनी सय्यद बंडाचे हात कलम करून शिवरायावरील हल्ला परतवून लावला. होते जीवा म्हणून वाचले शिवा हा इतिहास आपण वाचला आहे.इतिहास काळापासून ते वर्तमान काळात सर्वच क्षेत्रात नाभिक समाजाचे योगदान मोठे आहे.
नाभिक समाजातील तरुणांनी एकत्र येवून सहकारी तत्वावर औद्योगिक संस्था स्थापन करून व्यवसायासाठी आवश्यक वस्तूंचे उत्पादन घ्यावे, उच्चशिक्षणासाठी तरुणाच्या कार्यशाळा घेवून मार्गदर्शन करावे ,या तरुणांना नोकरीची जवाबदारी माझी राहील .जेजुरी येथील समाजाच्या जागेत सभागृह बांधण्यासाठी २५ लक्ष व सासवड येथे १५ लक्ष रुपयांचा निधी दिला जाईल असे यावेळी आमदार संजय जगताप यांनी यावेळी सांगितले.
पुणे जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष राहुल शेवाळे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, कोरोना काळात सर्वात मोठा फटका नाभिक समाजाला बसला. अशा वेळी आमदार संजय जगताप, तसेच आमदार राहुल कुल यांच्या माध्यमातून समाजाला मदत करण्यात आली. यावेळी नगरसेवक गणेश जगताप,रोहित इनामके,सुहासबाप्पू लांडगे,वामन तात्या जगताप,सम्रादित्य संजय जगताप, नाभिक समाजाचे नेते मुन्ना शिंदे, जिल्ह्याचे नेते अंकुश खडके, बेबीताई कर्हेकर,राजाभाऊ रायकर,माजी सरपंच नवनाथ मोरे,डॉ.मनोज शिंदे,बाळासाहेब गायकवाड,सागर उभाड,तुकाराम भागवत,सुशील गायकवाड,मल्हार राऊत,अमोल राऊत ,विजय राऊत,संदीप गायकवाड आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्या बदल मुंबई मंत्रालयातील सचिव नितीन क्षीरसागर, पुणे महानगरपालिकेचे समान पाणी पुरवठा अधिकारी विनोद क्षीरसागर यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असणारे डॉ तेजस्विनी इभाड, अड परेश इभाड,डॉ प्रशांत गायकवाड,संदीप राउत,देवकर तलाठी, विनय राउत,सोनाली इभाड,सचिन पवार,आनंद शिंदे, महादेव शिंदे,कलावंत अमर झेंडे व सासवड पालिकेचा देशात स्वच्छता अभियानात प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला.
यावेळी पुणे जिल्हा युवक संघटनेचे अध्यक्ष भारत मोरे, भोर तालुकाध्यक्ष शिवाजी राउत यांची भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जेजुरी देवसंस्थानचे माजी विश्वस्त नितीन राउत सूत्रसंचालन महेश राउत तर आभार पुरंदर तालुका अध्यक्ष राहुल मगर यांनी मानले.कार्यक्रमाचे नियोजन समाजाचे नेते मुन्ना शिंदे व पुरंदर तालुका ,सासवड,जेजुरी, नाभिक संघटनेच्या पदाधिकार्यांनी केले.