हवेली ज्ञानेश्वर पाटेकर
वृक्षारोपणामध्ये केसनंद,बकोरी, लोणी काळभोर, पिंपळे जगताप, वाघोली या ठिकाणी जवळपास एक लाखापेक्षा जास्त झाडे लावून ती जगवून दाखवणाऱ्या माहिती सेवा समितीच्या माध्यमातून गड किल्ले ट्रेकिंग ही नवी संकल्पना सुरू केल्यानंतर मागच्या महिन्यामध्ये राजगड किल्ला व या महिन्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या ऐतिहासिक किल्ल्यावर स्वराज्याचे पहिले तोरण बांधले तो तोरणा गड अर्थात प्रचंड गड असेही म्हणतात . समितीच्या 25 शूरवीर कार्यकर्त्यांनी यशस्वीपणे या गडावर ट्रेकिंग केले.
यामध्ये माहिती सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष चंद्रकांत वारघडे, पिंपळे जगताप येथे एक वर्षांमध्ये जवळपास तीस हजार झाडे लावण्याचा नवीन विक्रम करणारे माहिती सेवा समितीचे शिरूर तालुका अध्यक्ष धर्मराज बोत्रे हवेली तालुका माहिती सेवा समितीचे अध्यक्ष कमलेश बहिरट, माहिती सेवा गड किल्ले ट्रेकिंग समिती चे अध्यक्ष नानासाहेब जाधवराव, ऊद्योजक पिंटू दादा कटके संदीप डफळ, सतीश जगताप, नितीन कंद, संजय हरगुडे, धनश्री व धनराज वारघडे ,प्रीतम बोत्रे , स्टार महाराष्ट्र न्यूज चे पत्रकार ज्ञानेश्वर पाटेकर व कार्यकर्त्यांनी गडावर अतिशय आनंददायी व यशस्वीपणे ट्रेकिंग केले.. स्वतःची शारीरिक तंदुरुस्ती तपासण्यासाठी गड ट्रेकिंग सारखा दुसरा सुंदर पर्याय नाही, शासनाने गड किल्ल्यांचे संवर्धन, संरक्षण तसेच पर्यटकांची सुरक्षितता,गड परीसरात वृक्षारोपण याबाबत काम करण्याची गरज असल्याचे चंद्रकांत वारघडे यांनी सांगितले.
दोन पाय नसलेल्या परभणी येथील दामोदर ह्या एका दिव्यांग मावळ्यांने गड सर केला त्याचे स्वागत पिंटु दादा कटके यांचे हस्ते करण्यात आले व यापुढे त्या मावळ्याचा गड किल्ले ट्रेकिंग चा सर्व खर्च माहिती सेवा समितीचे माध्यमातून करण्यात येणार असल्याचे आवाहन ट्रेकिंग समिती चे व्यवस्थापक नितीन कंद यांनी केले आहे,