प्रतिनिधी गावडेवाडी मिलिंद टेमकर
पिंपळगाव खडकी (तालुका आंबेगाव) गावचे सुपुत्र गजानन आबाजी पोखरकर यांनी ते यापूर्वी अवैधरित्या चोरून लपून करित असलेले देशी-विदेशी दारू चा व्यवसाय त्यांनी पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेऊन त्यांनी त्यांचे ताब्यातील अवैध मालाचे घोड नदीमध्ये विसर्जन करून सदरचा व्यवसाय कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय घेतला,
त्याबाबत मंचर पोलीस स्टेशनचे , पोलिस् निरीक्षक सतीश होडगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे यांनी वेळोवेळी मार्गदर्शन करून त्याचे मन परिवर्तन केल्याने त्यांनी हा निर्णय घेतला असून प्रसंगी नंतर तो कोणताही अवैद्य व्यवसाय करणार नसले बाबत सांगितले या बाबत मंचर् पोलीस स्टेशनचे वतीने त्याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. पोखरकर यांच्या जीवनामधील परिवर्तनाचा आदर्श व प्रेरणा मिळणार असून त्यांच्या या निर्णयाबद्दल परिसरातून कौतुक व्यक्त होत आहे, जीवनामध्ये चांगल्या दिशेने परिवर्तन गरजेचे आहे, त्यामुळे समाजाला देखील प्रेरणा मिळते, पोखरकर यांचे या निर्णयाची सबंध आंबेगाव तालुक्यात व पंचक्रोशीत चर्चा चालू आहे,