उरुळी कांचन प्रतिनिधी नितीन करडे
पुणे सोलापूर महामार्गावर हडपसर 15 नंबर ते लोणी काळभोर दरम्यानच्या अंतरामध्ये आज सकाळी पहाटेपासून वाहतुकीची फारच कोंडी झाली होती, वाहन चालकांना व प्रवाशांना नाहक त्रास, पोलीस खात्याचे दुर्लक्ष,
संबंधित ठिकाणी आज सकाळी पहाटेपासून दिवसभर वाहतुकीची भली मोठी कोंडी झाली होती, महामार्गावरील शेवाळवाडी येथे आज सकाळी पावसाचे पाणी हायवेवर तुंबल्याने दोन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, पावसाची पाणी आटल्यानंतर दुपारपासून संध्याकाळपर्यंत पोलीस प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्यामुळे मोठी वाहतुकीची कोंडी झाली होती, यामध्ये वाहन चालक त्रस्त झालेली असून कित्येक तास वाहने या वाहतुकीच्या कोंडी मध्ये अडकून पडली होती, कामगारांना वेळेवर कामावर हजर राहत आले नाही, वेळेवर शेतमाल न पोचल्याने शेतकऱ्यांचे नुकसान, त्याचप्रमाणे हजारो गाड्या अडकून पडल्याने इंधनाची देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, शेवाळवाडी मार्केटमध्ये रात्रभर चाललेल्या पावसाचे पाणी साचल्याने दुपारचा शेतमाल बाजार पुणे- सोलापूर मार्ग वर भरल्याने देखील वाहनाची गर्दी झाली होती, ही वाहतुकीची कोंडी सोलापूर कडे जाताना, पुण्याकडे जाताना अशा दोन्ही उजव्या आणि डाव्या बाजूला होती, संबंधित खात्याने या मार्गावर होणारी वाहतुकीची कोंडी थांबवावी अशी मागणी नागरिकांकडून व ग्रामस्थांकडून होत आहे,