आळंदी प्रतिनिधी आरिफ भाई शेख
आळंदी देवाची आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या नूतन द्वितीय इमारतीचे उद्घाटन आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते झाले याप्रसंगी दीपचंद ओतवाल यांनी दिलेले भरिव देणगी मुळे इमारत फळास आली असे प्रतिपादन आपल्या प्रास्ताविकामध्ये संस्थेचे सचिव अजित वडगावकर यांनी केले, ज्ञानदानाचा पुण्य काम करत असताना अनेक अडचणी याचा मला अनुभव आहे तसेच सध्याचे राजकारण सूरचक्रावर आधारित आहे आणीबाणीच्या काळात तुम्ही आम्हाला त्रास दिला म्हणून आज आम्ही तुम्हाला वाटतं अशी मानसिकता राजकीय स्थितीमध्ये दिसत आहे आणि हे देशी त्याला बाधक असल्याचे वक्तव्य आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आळंदी देवाची येथील कार्यक्रमात केले सदर कार्यक्रमांमध्ये मारुती बाबा कोळेकर यांचे शुभाशीर्वाद तसेच डॉक्टर नारायण जाधव यांचे शुभाशीर्वाद आणि आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या शुभहस्ते या इमारतीतल्या उद्घाटन करताना दिलेल्या तमाम देणगीदारांचे सत्कार या ठिकाणी करण्यात आले,
श्री न्यानेश्वर शिक्षण संस्थेला बहाल केलेल्या आमदार दिलीप मोहिते पाटील संगणक कक्ष विभाग याचीही आमदार मोहिते पाटील यांनी पाहणी केली आणि सविस्तर माहिती जाणून घेतली या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष सुरेश काका वडगावकर विश्वस्त प्रकाश काळे विश्वस्त एलजी घुमरे सर विश्वस्त अशोक आबा कुऱ्हाडे सामाजिक कार्यकर्ते साहेबराव कुऱ्हाडे धानोरेचे सरपंच अनिल गावडे माजी सरपंच शिवाजी गावडे धानोरीचे युवा नेते पांडे शेठ गावडे कृष्णा खोरे विकास महामंडळ अध्यक्ष श्रीराम शेठ गावडे विद्यार्थी वर्ग नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते,