विजेच्या कडकडाटा सह कोरेगाव भीमा परिसरात ढगफुटी पाऊस

Bharari News
0
सुनील भंडारे पाटील
          कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) आणि परिसरातील गावांमध्ये विजेच्या कडकडाटासह, परतीचा,वळवाचा मुसळधार ढगफुटी पाऊस आज संध्याकाळी झाला, मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत,       
परतीच्या मुसळधार पावसाने थैमान मांडले असून या पावसामुळे आता फायदा मात्र कमी असून जास्त नुकसान होऊ लागले आहे, कोरेगाव भीमा परिसरातील वढू बुद्रुक, आपटी, वाजेवाडी, मांजरेवाडी, पिंपळे जगताप, सणसवाडी, दरेकरवाडी, धानोरे, डिग्रज वाडी, पेरणे, लोणीकंद, वडू खुर्द, डोंगरगाव, पिंपरी सांडस, वाडेबोल्हाई, तुळापूर व आसपासच्या गावांमध्ये अतिवृष्टीमुळे शेती पिके उध्वस्त झाली आहेत, त्याचप्रमाणे सपाट जमिनीमध्ये खोंगळ पडत आहे, रस्ते वाहून जात आहेत, दरवर्षी पेक्षा या वर्षी जास्तच पाऊस पडला आहे,   
आज सायंकाळी झालेल्या पावसाचे ढगफुटी सारखे उग्ररूप होते, विजेचा कडकडाट खूपच तीव्र होता, विजेच्या आवाजाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण तयार झाले होते, या भागात चार वेळा विजेचा मोठा कडकडाट झाला,तसेच अति मुसळधार पावसामुळे ओढ्या नाल्यांना गच्च भरून पूर आला होता, त्यामुळे आसपासच्या गावांचा संपर्क तुटला होता,
एकंदरीत परतीच्या वळवाच्या पावसाने फायदा कमी नुकसान जास्त होत असल्याने आता जनता पावसाला वैतागली आहे, शेती पिके पूर्णपणे वाया गेले आहेत, शासनाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई योजना तातडीने राबवावी व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, कंबर्डे मोडलेल्या शेतकऱ्याला आता सरकारच्या मदतीची अपेक्षा आहे,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!