शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
मुखई येथील कै.रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रमशाळा व कनिष्ठ महाविद्यालयामधील ४०० विद्यार्थ्यांची अकाश कंदील तयार करण्याची अनोखी कार्यशाळा पार पडली.
विद्यार्थ्यांनी भारतीय संस्कृतीतील पवित्र मानल्या जाणाऱ्या दिवाळी या सणानिमित्त आपल्या स्वतःच्या हाताने आकाश कंदील बनवण्याचा आनंद या कार्यशाळेतून घेतला. प्रशालेत गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांना प्रेरित करण्यासाठी प्राचार्य तुकाराम शिरसाट यांच्या प्रेरणेतून विद्यार्थ्यांकडे उपजत असणारे काही कौशल्य विकसित व्हावे त्यातून त्यांना प्रेरणा व कला गुणांना वाव मिळावा या हेतून शाळेत असे उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक भाग म्हणून आज शाळेत अकाश कंदील या कार्यशाळेच्या माध्यमातूल सुंदर आकर्षक पर्यावरण पुरक असे ४०० अकाश कंदील विद्यार्थ्यांनी तयार केले. प्रत्येक विद्यार्थी अतिशय उत्साहात या कार्यशाळेत सहभागी झाला त्यामुळे शाळेत मुलांमध्ये आनंदमय वातावरण दिसत होते. इको फ्रेडली वस्तूंचा वापर करून अतिशय माफक खर्चामध्ये आणि कमी वेळामध्ये सुंदर व आकर्षक अशा प्रकारचा आकाश कंदील तयार केला. वैशिष्ट म्हणजे तयार केलेला आकाश कंदील विद्यार्थ्यांना आपल्या स्वतःच्या घरावर दिवाळीच्या सणासाठी लावून सुशोभित करता येणार आहे. या उपक्रमाला अनेक पालकांनी उपस्थित राहून आपल्या मुलांची कला पाहीली.
या कार्यशाळेसाठी पुण्यातून अर्चना गर्जे तसेच वैशाली मॅडम उपस्थित होत्या. शाळेतील सर्व शिक्षक वृंदांनी कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. संस्थेच्या अध्यक्षा जयश्रीताई पलांडे, कार्याध्यक्ष अँड अशोकराव पलांडे व सचिव सुदेश पलांडे यांनी या स्तुत्य उपक्रमाबद्दल सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले. कार्यशाळेचे प्रास्ताविक प्राचार्य तुकाराम शिरसाट यांनी केले तर मनोज धिवार यांनी आभार मानले.