हवेली प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटेकर
हिंदु हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या कट्टर हिंदुत्ववादी विचाराची परंपरा मुंबईतील शिवतीर्थावर दसरा मेळाव्याच्या निमित्ताने अखंडितपणे पुढे चालू असलेल्या शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विचार ऐकण्यासाठी वाघोली तालुका हवेली येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून शिवतीर्थ दादर येथे येण्या जाण्याची संपूर्ण व्यवस्था पुणे जिल्हा वाहतूक सेनेच्या माध्यमातून पुणे जिल्हा वाहतूक सेना प्रमुख युवराज दळवी यांच्या स्वखर्चातून लक्झरी बसेसची व्यवस्था करण्यात आली होती,
येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून वाजत गाजत घोषणाबाजी करत हातात भगवे झेंडे व विचारांचे बॅनर घेऊन दुपारी बारा वाजता कट्टर शिवसैनिकांचे शिवतीर्थाकडे प्रस्थान झाले याप्रसंगी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती याप्रसंगी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष उदय दळवी पुणे जिल्हाध्यक्ष युवराज दळवी पुणे जिल्हा प्रमुख माऊली आबा कटके माजी तालुकाप्रमुख राजेंद्र पायगुडे वाघोली शहर प्रमुख दत्तात्रय बेंडवले उपजिल्हाप्रमुख वाहतूक सेना राजेंद्र तांबे नियोजन समितीचे संजय सातव पाटील रामकृष्ण सातव पाटील हवेली युवासेना प्रमुख मच्छिंद्र सातव पाटील
महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रद्धा कदम अश्विनी पांडे अलका सोनवणे प्रवीण कांबळे उत्तम लोले रमेश तांबे अक्षय दळवी गणेश पवार गुलाब गायकवाड सुरेश सातव रमेश आव्हाळे शिवाजी ब्रिगेडचे गुलाब गायकवाड यासह असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,