माजी सैनिकाने केली अनाथ मुलाच्या शिक्षणासाठी मदत

Bharari News
0
सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
        एकाद्याने आपला पडालेला पेन उचलून दिला, तर थॅक्यु म्हणतो . कुणी जर समाजाला सतत मदत केली तर त्याला ' देवमाणूस ' संबोधतो . अशाच एका देवमाणसाचं देवत्व सामाजीक कार्यकर्ते निलेश जगताप यांना दिसले . त्यांनी अनुभवलेला माणसातला देव माणूस म्हणजे महाराष्ट्र राज्य माजी सैनिक संघटनेचे सचिव मेजर तुकाराम डफळ ! कोयाळी पुनवर्सन येथील हायस्कुल मध्ये शिकणाऱ्या अनाथ मुलाला डफळ यांनी संघटनेऐवजी स्वतः मदत केली,  
त्या ठिकाणी हा शर्मा नावाचा परप्रांतीय अनाथ पण हुशार विद्यार्थी  शिकत  आहे व त्याचे वडील हे भारतीय लष्करामध्ये होते , त्यांना अतिरेकी हल्ल्यात गोळी लागली होती आणि त्यात ते शहीद झाले . त्यानंतर त्यांची पत्नीही पतीच्या मृत्युच्या धक्याने हाय खावून स्वर्गवासी झाली आणि तो मुलगा अनाथ बनला . कालभैरवनाथ माध्यमिक विद्यालयामध्ये इयत्ता नववी मध्ये आहे .वर्गामध्ये तो पहिल्या नंबरने पास होतो व त्याचा काही खर्च शाळेचे शिक्षक मिळून करतात हे मेजर डफळ यांना समजले व ते त्या मुलापाशी जाऊन प्रेमाने आपुलकीने आपल्या जवळ घेऊन त्याच्या डोक्यावरून हात फिरवून आईवडीलाविना पोरक्या परंतु हुशार आणि मेहनती मुलाला क्षणाचाही विलंब न करता मेजर डफळ यांनी आपल्या खिशामध्ये हात घालून त्या विद्यार्थ्याला शालेय उपयोगी वस्तू घेण्यासाठी आर्थिक मदत केली व भविष्यामध्ये कुठलाही प्रसंग आला तर न घाबरता न डगमगता माझ्याशी संपर्क कर ,मी तुला सदैव मदत करीन असा शब्द दिला .  या आजच्या  धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या रक्ताच्या नात्यांकडे लक्ष द्यायला कुणाला वेळ  नसतो ,परंतु समाजाच्या शेवटच्या घटकावर बारकाईने लक्ष ठेवून मदत करणारा माणसातला खरा देव माणूस प्रथम पाहिला, त्या माणसाचं नाव मेजर तुकाराम डफळ !महाराष्ट्र राज्य माजी सैनिक संघटना सचिवपदी  असलेल्या अतिशय प्रगल्भ विचारसरणीचे हे मेजर डफळ निवृतीनंतर स्वखर्चाने शाळांनी फिरून करीअर मार्गदर्शन करतात .
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!