सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
"डाँ रामचंद्र देखणे यांनी भारूडादी संतसाहित्याने आयुष्यभर समाजप्रबोधन केले " असे प्रतिपादन ." पिंपरी चिंचवड नाट्य परीषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी शिक्रापुर येथे नाट्य परिषद आयोजीत शोकसभेत केले . किर्तन भारूड आदीद्वारे परदेशातही त्यांनी जनजागृती केली . त्यांनी केलेल्या लोकजागृतीचे कामाचे स्मरण जन्मगावी कारेगाव येथे डॉ. देखणे यांचे स्मारक उभारलेस पिंपरी चिंचवड नाट्य परिषद शाखा आर्थिक मदत करेल , असेही भोईर यांनी आस्वाशीत केले . मलठण फाटा येथील सिद्धी विनायक स्कूलमध्ये संत साहित्याचे गाढे अभ्यासक डाँ रामचंद्र देखणे हे अष्टपैलु व्यक्ती मत्व होते व त्यांचे समाजप्रबोधनाचे कार्य अंथांग सागरासारखे होते . त्यांनी परदेशातही आपले कार्य पोहचवले . भारुड ,किर्तन यातुन त्यांच्या विचाराची परांपरा अशीच जपली जावी अशी अपेक्षा त्यांनी शोकसभेत व्यक्त केली . त्यांचे
आठवणीना उजाळा देताना भोईर हे भावुक झाले . डाँ देखणे यांनी केलेले समाजप्रबोधन
खुपच वाखण्यासारखे आहे असे मत पिंपरी चिंचवड नाट्य परिषदेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांनी व्यक्त केले . सिध्दीविनायक पब्लिक स्कुलमध्ये नाट्य परिषद शिरुर तालुका शाखेच्या वतीने संत साहित्याचे गाढे अभ्यासक डाँ रामचंद्र देखणे यांच्या निधनामुळे शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते . भोईर यांचे हस्ते प्रतिमेला पुष्पहार घालून शोकसभेला सुरुवात झाली .
नाट्य परिषदेच्या सदस्या सौ .विजया कदम यांनी तर प्रास्ताविक शिरुर तालुका नाट्य शाखेच्या अध्यक्षा सौ. दिपालीताई शेळके यांनी केले. . शिरुर शाखेच्या वतीने त्याच्या नावाने विविध क्षेञातील पुरस्कार पुढील वर्षापासुन देण्यात येतील. असे शेळके यांनी सांगितले . डाँ देखणे यांनी महाराष्ट्र भर प्रबोधन केले आसले तरी त्याचे मुळ गाव शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे ग्रामस्थानी मनावर घेऊन त्यांचे स्मारक उभारले तर पिंपरी चिंचवड नाट्य शाखा त्यांना आर्थिक मदत करेल . त्यांची आठवण महाराष्ट्रात कायम स्मरणात राहिल. परतुं जन्मगावी राहण्यासाठी ग्रामस्थानी पुढाकार घ्यावाअसे आवाहन भोईर यांनी केले .
यावेळी महावितरणाचे रामेश्वर ढाकणे .मिनाताई गवारी .तेजस फडके . मनिषा धुमाळ तुकाराम भगत .बाबुराव साकोरे .सदिप नवले .नवनाथ डफळ राजश्री खामकर आदीनी श्रध्दाजली वाहिली . यावेळी नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष बाळासाहेब शेळके .मनिषा सायकर माणिकराव आढाव .खंडेराव तनपुरे .दताञय धुमाळ दिलीप चातुर .मारुती दसगुडे सुरेश काळोखे . नाट्य परिषदेचे राजाराम गायकवाड कार्यक्रमाचे अभार नाट्य परिषदेचे वैशाली थिटे यांनी मानले कार्यक्रमाची सांगता माऊलीच्या पसायदानाने झाली उपस्थिती शिरुर ता.डाँट काँमच्या कु किरण पिंगळे संजय सुर्वे .सुखदेव राक्षे.रोहिणी डफळ सिमा मोहिते . वैशाली बांगर रेखा कळमकर सुषमा गायकवाड .व इतर उपस्थित होते,