लोणी काळभोर प्रतिनिधी अनिकेत मुळीक
पुणे (तालुका हवेली) गुलटेकडी मार्केट सात हि चालू ठेवण्याची रयत क्रांती संघटनेची मागणी पत्राद्वारे केली आहे त्यांनी दिलेल्या माहिती नुसार..छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड,गुलटेकडी,पुणे हे साप्ताहिक सुट्टी म्हणून दर शनिवारी घेतली जाते.ही सुट्टी आता बंद होणार आहे,
सद्यपरिस्थती पाहता रहदारीची मोठ्या प्रमाणात झालेली वाढ तसेच जिल्ह्यातील, राज्यातील,परराज्यातील शेतकरी ,व्यापारी मोठ्या संख्येने पुण्यामध्ये येत असतात. शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला शेतमाल विक्रि करणे करिता या बाजार आवरा मध्ये पाठवत असतात. बाजारभाव मिळेल,न मिळेल याची वातावरणातील बदलत्या परिस्थितीमुळे शाश्वती वाटत नाही.दर शनिवारी हा बाजार बंद असल्या कारणाने शुक्रवारी व रविवार ची बाजार आवारात प्रचंड प्रमाणात गर्दी होत असते.त्यामुळे खरेदीदारानी खरेदी केलेला शेतमाल निश्चित केलेल्या वेळेमध्ये आपापल्या दुकानावरती पोहचेल याचीही शाश्वती नसते.त्याचबरोबर सदरच्या वाहतुकीचा ताण निश्चितच पोलिस यंत्रणा, आजूबाजूचा परिसर व शहरामध्ये सततचा येत असतो.या करीता रयत क्रांती संघटना मांजरी उपबाजार आवार हा ज्या पद्धतीने सात हि दिवस भरला जातो.आशाचा पद्धतीने मुख्य फळे व भाजीपाला बाजार आवार आठवड्यातील सात दिवस चालू ठेवण्यात यावा अशी मागणी (रयत क्रांती संघटना पुणे जिल्हा महाराष्ट्र राज्य: अध्यक्ष सूर्यकांत काळभोर पत्रा द्वारे यांनी केली आहे.
छत्रपती शिवाजी मार्केट गुलटेकडी पुणे, दर शनिवारी बंद असल्यामुळे बंद ठेवून हे सर्व शेतकरी संघटना व मार्केट कमिटीने घेतलेला निर्णय सात हि दिवस मार्केट यार्ड चालू राहण्यासाठी शेतकऱ्यांची संघटना रयत क्रांतीने मागणी केली आहे ही मागणी मार्केट कमिटीच्या मीटिंगमध्ये मान्य केली आहे. सुट्टी न घेता सात हि दिवस मार्केट चालू राहील,