सुनील भंडारे पाटील
शिरूर वनपरिक्षेत्र कार्यालयातील वनपरिक्षेत्र अधिकारी शिरूर प्रादेशिक कार्यालयाच्या अंतर्गत, 10000 लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी सापळा रचून रंगे हात पकडले,
याबाबत शिरूर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण गुन्हा रजिस्टर नंबर 687 / 2022 भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7 अन्वये लाचखोर लोकसेवक प्रवीण अर्जुन क्षीरसागर वय 40 याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, तक्रारदार हे झाडे तोडणारे ठेकेदार आहे, त्यांनी ठेका घेतलेली झाडे तोडून या लाकडांची टेम्पो ने वाहतूक करत असताना त्यांचा टेम्पो क्षीरसागर यानी ताब्यात घेतला होता,
तो टेम्पो सोडण्यासाठी व कारवाई न करण्यासाठी क्षीरसागर याने तक्रारदाराकडे 10000 रुपयांची लाच मागितली, अशी तक्रार अँटी करप्शन ब्युरो पुणे यांच्याकडे आली, सदर तक्रारीची पडताळणी केली असता शहानिशा करून सापळा रचण्यात आला, शिरसागर याने 10000 रुपये ची मागणी करून ती स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी रंगेहात पकडले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास ला प्र वी पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक भारत साळुंखे करत आहेत,
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त / पोलीस अधीक्षक ला प्र वी राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, यांचे मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने केली