सासवड प्रतिनिधी बापू मुळीक
नियमित पिककर्ज भरणा-या शेतकऱ्यांसाठी शासनाने महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ अनुदान देण्याची घोषणा केली होती. गुरूवारी ( दि १३ ) पहिल्या टप्प्यात २ हजार ६२८ शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मंजुरी मिळाली आहे. आणखी दोन टप्प्यांत पुरंदर तालुक्यातून सर्व एकूण १४ हजार ३४६ शेतकर्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.
शेतकऱ्यांनी कर्जफेडीमध्ये सातत्य ठेवावे आणि सहकार टिकवणासाठी सहकार्य करण्याचे आवाहन आमदार संजय जगताप यांनी केले आहे.
पुरंदर - हवेलीचे आमदार आणि जिल्हा बँकेचे संचालक संजय चंदूकाका जगताप यांच्या उपस्थितीत जिल्हा बँकेच्या सासवड शाखेत नियमित पिककर्ज भरणा-या आणि प्रोत्साहन अनुदानास पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना सन्मानीत करण्यात आले. प्रोत्साहन अनुदानासाठी पुरंदर तालुक्यातून एकूण १४ हजार ३४६ पात्र होत असून यासाठी अंदाजे ५६ कोटी अनुदान रक्कम येणे अपेक्षित असल्याचे जिल्हा बँकेचे विभागीय अधिकारी महेश खैरे यांनी सांगितले.
महाविकास आघाडी सरकारने नियमित पिककर्ज भरणा-यांसाठी ५० हजार रुपयां पर्यंतच्या प्रोत्साहन अनुदानाची घोषणा केली होती. तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार यांनी याबाबत पुढाकार घेतला होता. आताच्या सरकारनेही यास मंजुरी दिली आहे. यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार असल्याचे सांगत आमदार संजय जगताप यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ दिगंबर दुर्गाडे आणि उपाध्यक्ष सुनील चांदेरे यांच्याही वतीने लाभार्थी शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.
यावेळी कात्रज डेअरी चे संचालक तानाजी जगताप, सोमेश्वर साखर कारखान्याचे संचालक तुषार माहूरकर, महेंद्र माने, जिल्हा बँकेचे अधिकारी जयेश गद्रे, आण्णा शिंदे, किरण जाधव, हनुमंत मचाले, पुरंदर नागरीचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे, नंदकुमार जगताप, शांताराम जगताप, गणेश जगताप, विठ्ठलराव मोकाशी, देविदास कामथे, सचिव मुकुंद जगताप, दिपक जगताप, वैभव काकडे, अमोल यादव, जालिंदर बाठे, राहुल घारे तसेच लाभार्थी शेतकरी सुनंदा जगताप, रेखा जगताप, त्रिंबक जगताप, संतोष कोंडे, सोमनाथ खळदकर आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सदर रक्कम जमा होणार असून लाभार्थींनी आधार प्रमाणिकरणासाठी जिल्हा बँकेच्या शाखेत संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा बँकेच्या वतीने जयेश गद्रे यांनी केले आहे.