शिक्रापूर : प्रा. एन.बी.मुल्ला
आजचा विद्यार्थी हा भावी समाज आणि देशाचा सुजाण नागरिक आहे त्यामुळे समाजहित आणि देशहित साधण्यासाठी सुसंस्कृत विद्यार्थी शाळा- शाळा मधून घडणे अपेक्षित असल्याचे प्रतिपादन शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे सचिव मारुती कदम यांनी केले.
भांबर्डे (ता.शिरूर) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये श्री संत ज्ञानेश्वर महाराज कृत हरिपाठाचे शालेय विद्यार्थी आणि शिक्षक शिक्षेतर सेवकांना वाटप करण्यात आले. ही हरीपाठाची पुस्तके श्री अंबिका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचाल प्रा. शिवाजी वीर यांनी दिली. विज्ञान आणि अध्यात्म एकत्र आले की मानवाची आर्थिक, भावनिक आणि शारीरिक प्रगती होते. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी दररोज हरीपाठाचे वाचन केले पाहिजे. हरिपाठाचा अर्थ समजावून घेतला पाहिजे असेही मारुती कदम यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले. यावेळी उत्तम गाडे, सुरेश शेळके, बाळासाहेब दिवेकर, सविता शिंदे, रोहिदास इंगळे, नानाभाऊ थोरात, लालासाहेब जगताप, विठ्ठल जगदाळे आदी उपस्थित होते.