आंबेगाव प्रतिनिधी प्रमिला टेमगिरे घोडेगाव (तालुका आंबेगाव) येथे
28/09/2022 रोजी माहिती अधिकार दिन साजरा करण्यात आला.''माहिती आधिकाराचे औचित्य साधून"जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोर, व पर्यावरण प्रमुख ज्ञानेश्वर (माऊल) ऊंडे. यांच्या मार्गदर्शनाखाली .आखिल भारतीय ग्राहक पंचायत आंबेगाव तालुका च्या वतीने. तालुक्यातील विविध सरकारी कार्यालयांमध्ये सामुदायिक रित्या जाऊन माहिती अधिकारची सामन्या जनतेची कामे सुलभ होण्याच्या दुष्टिने जनजागृती करण्याचे काम तालुका ग्राहक पंचायत करत आहे.
विविध सरकारी कार्यालये मधे भेटि दिल्या तहसीलदार कार्यालय घोडेगाव, भुमी अभिलेख कार्यलय घोडेगाव, पंचायत समिती घोडेगाव, महावितरण कार्यलय घोडेगाव, तसेच प्रांत कार्यलय मंचर. आंबेगाव / जुन्नर,या सरकारी कार्यालये मधे भेटी देऊन पाहणी केली.
कार्यलयीन कर्मचारी व आधिकारी कार्यलयीन वेळेत हजर नसल्याचे दिसून आले.
तर सकाळी 9.45 ची वेळ आसताना अनेक कर्मचारी 10 ते 11 च्या दरम्यान कार्यालयात असल्याचे निदर्शनास आले. या बाबत आखिल भारतीय ग्राहक पंचायत आंबेगाव च्या पथकाने अध्यक्ष सुभाष मावकर यांच्या नेतृत्वाखाली तहसिलदार आंबेगाव , पंचायत समिती आंबेगाव, व प्रांत कार्यलय मंचर आंबेगाव / जुन्नर या कार्यलयात निवेदन देण्यात आले,,
वरिल निवेदन सादर करत असताना खालिल पदाधिकारी हजर होते. जिल्हा उपाध्यक्ष अशोक भोर .पर्यावरण समिती प्रमुख ज्ञानेश्वर माऊली ऊंडे.तालुका अध्यक्ष सुभाष मावकर. संघटक देविदास काळे. सचिव सुदाम भालेराव.सक्रिय सदस्य वैभव वायाळ. रामदासजी थोरात. तुळशीराम मामा लोंढे. कांताराम काळे. दशरत काळे संजयशेट चिंचपूरे, दुंदा सुपे हे धडाडिचे कार्यकर्ते उपस्थित होते