सासवड :प्रतिनिधी :बापू मुळीक
सासवड शहर शिवसेना युवा सेनेच्या अध्यक्ष पदी सासवड (ता. पुरंदर ) येथील सुरज (बिट्टू) माने व सासवड शहर शिवसेना अध्यक्षपदी डॉ.राजेश दळवी यांची निवड झाली आहे.( शिंदे गट)
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व शिवसेना उपनेते, माजी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतरे यांच्या आदेशानुसार पुणे जिल्हा युवा सेना प्रमुख उमेश गायकवाड यांनी निवडीचे पत्र सुरज माने व डॉ.राजेश दळवी यांना दिले. दिलीप यादव ,डॉ.राजेश दळवी,नगरसेवक सचिन भोंगळे,नगरसेविका अस्मिता रणपिसे,ममता लांडे,वैशाली काळे,कुंडलिकभाऊ जगताप ,मंदार गिरमे,अजित चौखंडे,माणिक निंबाळकर,धीरज भिंताडे,अनिकेत जगताप, अक्षय पोमण,माजी सरपंच गणेश मुळीक ,रमेश इंगळे , पुरंदर तालुका शिवसेना विद्यार्थी सेना अध्यक्ष अविनाश बडदे,युवानेते ओंकार जगताप,सुरज जगताप, रोहित ताम्हाणे, प्रविण लोळे, सागर यादव,सागर मोकाशी व शिवसेना युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.
सुरज माने यांनी कोरोना काळात रक्तदान, अन्नदान , कोविड सेंटरला मदत मदत केली होती. त्याचबरोबर ते सातत्याने सामाजिक कार्यात सहभागी असतात.