सासवड प्रतिनिधी बापू मुळीक
पुरंदर तालुक्यातील बोपगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या वतीने मंगळवारी ( दि ११ ) सभासदांना १५ टक्के लाभांश वाटप पुरंदर - हवेलीचे आमदार, जिल्हा बँकेचे संचालक संजय चंदूकाका जगताप आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते करण्यात आले.
बोपगाव सोसायटीचे कर्जवाटप ३ कोटी ५१ लाख ३२ हजार रुपये केले असून राखीव निधी १७ लाख ५९ हजार रुपये असून यंदा संस्थेला २३ लाख ३१ हजार रुपये नफा झाला आहे. संस्थेचे ९३८ सभासद असून यंदा १५ टक्के लाभांश वाटपाचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असल्याचे संस्थेचे अध्यक्ष भिमाजी फडतरे यांनी सांगितले.
जिल्हा बँक शेतकऱ्यांची बँक असून शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेते. ३ लाखापर्यंत शुन्य टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा केला जात असून याचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आमदार संजय जगताप आणि जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ दिगंबर दुर्गाडे म्हणाले. याप्रसंगी जिल्हा बँकेचे अधिकारी राजन जगताप, पुरंदर नागरीचे सरव्यवस्थापक अनिल उरवणे, उपाध्यक्ष भिमाजी फडतरे, सरपंच शालन अर्जुन फडतरे तसेच योगेश फडतरे, दयानंद फडतरे, साहेबराव फडतरे, प्रकाश फडतरे, चंद्रकांत फडतरे, सर्जेराव जगदाळे, बाबासाहेब फडतरे, विजय फडतरे, कानिफनाथ फडतरे, सोपान फडतरे, लक्ष्मण फडतरे, सचिव अमोल फडतरे, संचालक संदीप फडतरे, सोपान फडतरे, आप्पासो फडतरे, अतूल फडतरे, सुरज जगदाळे, सोमनाथ गोफणे, विनायक गुरव, संपत गायकवाड, मनिषा फडतरे, सुशीला फडतरे आदी उपस्थित होते.