सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
अतीवृष्टीमुळे कान्हूर मेसाई वरील तलाव फुटल्याने दुकाने व नागरीकांचे घर सामानांचे मोठे नुकसान झाल्याने प्रशासकीय यंत्रना व नेत्यांनी पहाणी करून संवेदना दर्शवित महसूल विभागाने पंचनामे करून त्वरीत कलेक्टर ऑफिसला पाठविलेचे कान्हूर मेसाईचे तलाठी अभिजीत जोशी यांनी सांगीतले .
शिरूरचे तहसिलदार प्रशांत पिसाळ, मंडलाधिकारी प्रशांत शेटे, केंदूरचे तलाठी रमेश घोडे , धामारीच्या तलाठी अनुजा घुगे , सहाय्यक तुकाराम पुंडे यांनी नुकसान झालेली घरे ,दुकाने ,घर सामान आदीची पहाणी करून पंचनामे केले . आपदग्रस्तांची मंदिर परीसरात तात्पुरती व्यवस्था केली . बाबु थोरात यांचे घरासह सामान वाहून गेल्याने नेहमीप्रमाणे शहाजी दळवी यांनी त्यांचेसाठी मदतीचे आवाहन करता दात्यांनी सामाजीक जाणीवेने मदत केली . माजी जि प सदस्य शेखर पाचुंदकर यांनीही भेट दिली . माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील , माजी सभापती प्रकाश पवार, विश्वास आबा कोहकडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर , भीमाशंकर कारखान्याचे संचालक प्रदिप वळसे पाटील , राष्ट्रवादीचे सरचिटणीस बबनदादा शिंदे यांनी भेट देवून पहाणी केली . यावेळी सरपंच चंद्रभागा खर्डे, माजी सरपंच बंडू पुंडे , सुरेश खर्डे , उपसरपंच सोपान पुंडे, मोहन पुंडे , आनंदराव तळोले, पिराजी माकर आदींनी नुकसानीची माहीती देत तात्काळ मदत मिळावी असी मागणी करता वळसे पाटील यांनी शासकीय यंत्रणेला त्वरीत कार्यवाहीसाठी सूचना दिल्या,