कान्हूर मेसाई पुरग्रस्तांना शिक्षकांसह दानशुरांकडून मदतीचा ओघ -- शहाजी दळवी

Bharari News
0
सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले 
         कान्हूर मेसाई (ता. शिरूर) येथे अतिवृष्टीने तलाव फुटून गावठाणात पाणी घूसून झालेल्या नागरीकांना काल प्राथमिक शिक्षकांनी ६१०० रुपये दिले तर आज विद्याधाम हायस्कूलचे शिक्षकांनी सामाजीक दायीत्व म्हणून ५१हजार रुपये व विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करणेत आले .     
दातृत्वात नेहमीच अग्रेसर बबनदादा व चेअरमन संतोष शिंदे परीवाराने ११ हजार, मोहन भागाजी ननवरे ५००० , सरपंच चंद्रभागा विठ्ठल खर्डे ५००० , अमोल रामदास पुंडे ३५०१ , रोहिदास ढगे २५०० , नवनाथ निचीत २००० व संतोष सातकर आदी अनेक दात्यांनी यथाशक्ती हजार पाचशाची मदत केलेचे त्यांचे शहाजी दळवी व ग्रामस्थांनी आभार व्यक्त केले . मोठ्या संख्येने रहिवाशांचे अतोनात नुकसान झालेने सगळी कडूनच आभाळ फाटलेने ते शिवण्यांचा जोडण्याचा त्याला थोडाफार टेकू देण्याचा प्रयत्न करावा असे कान्हूर मेसाई ग्रामस्थांनी दानशूर दात्यांना विनम्र आवाहन केले आहे . विद्याधाम हायस्कूलचे प्राचार्य अनिल शिंदे व सहकारी शिक्षक वृंदानी हायस्कूल प्रांगणात बोलवून आपदग्रस्त महिला व विद्यार्थ्यांना साहीत्य वाटप केल्याने त्यांचे हे काम परीसरात कौतुकास्पद असलेचे विचारशहाजी दळवी व ग्रामस्थांनी व्यक्त केले .
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!