सुनील भंडारे पाटील
शिक्रापूर (तालुका शिरूर) पोलीस स्टेशन हद्दीतील पुणे नगर महामार्गावर शिक्रापूर चाकण रोडवर अवजड वाहने सकाळी व सायंकाळी वाहतुकीसाठी बंद राहतील, असा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी कार्यालय गृह शाखा पुणे यांनी जारी केला आहे
या भागातील वाहतुकीची कोंडी लक्षात घेता, पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी प्रस्ताव दाखल केला होता की शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीत पुणे नगर महामार्गावर 20 किलोमीटर, तसेच शिक्रापूर चाकण मार्गावर 9 किलोमीटर भागात मोठ्या प्रमाणात गोडाऊन, हायस्कूल, कॉलेज,मंगल कार्यालय, हॉस्पिटल तसेच एमआयडीसी क्षेत्र असून सदर भागात ठिकठिकाणी रोड क्रॉसिंग आहेत तसेच या मार्गावरील कोरेगाव भीमा, सणसवाडी,शिक्रापूर, कोंढापुरी, येथे मोठे औद्योगिक क्षेत्र आहे, त्यामुळे अवजड वाहने ये - जा करतात, स्कूलबस, कामगार बस यांची वर्दळ असते त्यामुळे वाहतुकीची कोंडी होत असल्याने नागरिकांची गैरसोय होते, अपघात होतात त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असतो, म्हणून या मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक काही काळ बंद करण्याची बाब पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण यांनी निदर्शनास आणून दिलेली आहे,
या प्रस्तावावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पुणे राजेश देशमुख यांनी आदेश काढला असून त्यात नमूद केले आहे की, मोटार वाहन कायदा 1988 कलम 115 मधील तरतुदीनुसार 19, 5,,1990 च्या अधिसूचनेनुसार शिक्रापूर पो स्टेशन हद्दीतील संबंधित ठिकाणी वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी 21,10,2022 ते 4,11,2022 या पंधरा दिवसांसाठी सकाळी 7:00 ते 11 :00 आणि सायंकाळी 4:00 ते रात्री 8:00 वाजेपर्यंत च्या कालावधीत रस्ता अवजड वाहनांसाठी बंद आहे,