सुनील भंडारे पाटील
चतुर्श्रुंगी पुणे येथील पोलीस स्टेशन, पुणे शहर गुन्हा रजिस्टर नंबर 484 / 2022, भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम 7, अन्वये चतुर्श्रुंगी पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेला लोकसेवक, पोलीस हवालदार व पोलीस शिपाई 25 हजारांची लाच घेताना पुणे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग यांनी रंगेहात पकडला,
याबाबतीत तक्रारदारांच्या आत्ते भावाचे विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करावा लागेल असे धमकावून चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी आरोपी लोकसेवक प्रशांत विठ्ठल जाधव वय 50, (पद पोलीस हवलदार), त्याचप्रमाणे त्याचा साथीदार अजित शांताराम गायकवाड वय 37, (पद पोलीस शिपाई) यांनी 50 हजार रुपये लाचेची मागणी केल्याची तक्रार अँटी करप्शन ब्युरो पुणे यांच्याकडे प्राप्त झाली होती,
अँटी करप्शन ब्युरो पुणे त्यांच्या वतीने औंध पोलीस चौकीजवळ सापळा तयार करण्यात आला तसेच सदर तक्रारीची पडताळणी केली असता, चोरीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी जाधव आणि गायकवाड यांनी 50 हजाराची लाच मागणी करून तडजोडी आणती 25 हजार रुपये लाच स्वीकारताना लाचरुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांनी रंगेहात पकडले, त्यांना मा विशेष न्यायालय पुणे येथे हजर केले असता 9,11, 2022 पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड चा आदेश दिले आहेत, पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे युनिटचे पोलीस निरीक्षक प्रणेता सांगोलकर करत आहेत,
सदरची कारवाई पोलीस उपायुक्त / पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुरव, लाच रुचपत प्रतिबंधक विभाग पुणे यांच्या पथकाने केली,