हडपसर पोलिसांची मोठी कारवाई-२२ लाखांचा मुद्देमाल जप्त= सराईत आरोपींना बिहार मधून अटक

Bharari News
0
लोणी काळभोर प्रतिनिधी
        हडपसर पोलीस स्टेशन ,पुणे शहर -२२ लाखांचा मुद्देमाल जप्त, पुणे शहरातील मोबाईल शॉपी फोडीचे ५ गुन्हे उघड सराईत आरोपीसबिहार मधुन अटक,
    दिनांक २३/१०/२०२२ रोजी ऊरळी देवाची ता.हवेली जि-पुणे येथील स्वप्नील परमाळे यांच्या न्यु साई मोबाईल दुकानाचे शटर तोडून आतील १९ लाख रुपयांचे १०२ मोबाईल चोरी झालेचा हडपसर पोलीस ठाणेस गु.र.नं १३२८/२०२२ भा.दं.वि.कलम ४५७,३८०,४२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
दुकानामध्ये असणारे सीसीटीव्ही तसेच दुकानाच्या बाहेरील बाजुस सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून अनोळखी आरोपी व त्यांनी वापर केलेले चारचाकी वाहनाबाबत पोलीस अंमलदार शाहीद शेख आणि अतुल पंधरकर यांना मिळालेल्या बातमीवरून सदर ठिकाणी जावून १)साहिल अनिल मोरे वय २० वर्षे रा. देशमुखवाडी, इंगळे कॉर्नर, शिवणे,पुणे. यास डुक्करखिंड, पुणे येथे त्यांना वाहनासह ताब्यात घेतले. त्यास पो उप नि अविनाश शिंदे यांनी पोलीस कस्टडीत विचारपुस करुन गुन्हयातील इतर यांची नावे निष्पन्न कैली.
      पोलीस कस्टडीतील चौकशीत आणखी एक आरोपी २)संकेत प्रकाश निवगुणे वय २२ वर्षे रा. बानगुडे चाळ, संघर्ष चौक, यशोदिप सोसायटी, वारजे माळवाडी, पुणे. यास ताब्यात घेऊन सदर गुन्हयातील सुत्रधार लक्ष्मण आण्णा जाधव हा चोरीतील मालासह एकमा पोलीस स्टेशन, जिल्हा, छपरा, बिहार मधील एका गावात असल्याची शक्यता वाटल्याने वरीष्ठांच्या परवानगीने तपासपथकाचे अधिकारी पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, अंमलदार शाहीद शेख, अतुल पंधरकर, भगवान हंबर्डे यांना तात्काळ रवाना करण्यात आले.
तसेच तपास पथकामधील सपोनि विजयकुमार शिंदे व पो ना. संदीप राठोड याने केलेल्या तपासाच्या आधारे मुद्देमालाची विल्हेवाट लावणारा याचे राहते घरी हडपसर पोलीसांनी छापा मारला असता सराईत आरोपी लक्ष्मण आण्णा जाधव वय ३४ वर्षे रा. हॅप्पी कॉलनी, लेन नंबर-३, गोसावी वस्ती, कोथरुड पुणे. हा सदर ठिकाणी गुन्हयातील चोरीस गेलेल्या मोबाईलपैकी ९७ मोबाईलसह ताब्यात घेतले. त्यास गुन्हयामध्ये स्थानिक न्यायालयाकडून ट्रांन्जीट रिमांड घेवुन मा.प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी साो. लष्कर न्यायालयात हजर केले.
तीनही आरोपी पोलीस कस्टडीत असुन अद्याप पर्यंत निष्पन्न हकीकत अशी की, इतर आरोपी यांनी मिळून हडपसर, कोंढवा, धायरी, चतुःशृंगी या भागातील मोबाईलची दुकाने फोडून मोबाईल लक्ष्मण आण्णा जाधव यास देत होते. सदरचे मोबाईल हे लक्ष्मण आण्णा जाधव त्याचा साथीदार यास विकत होता. मोबाईल विकून आल्यानंतर मोबाईलच्या किंमतीच्या ४० टक्के रक्कम ही आरोपींना मिळत होती.
अद्यापपर्यंत आरोपींकडून गुन्ह्यातील ९७ मोबाईल, इंडिका कार, होंडा अॅक्टीवा दुचाकी असा २२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
      गुन्हयातील मुख्य सुत्रधार आरोपी लक्ष्मण आण्णा जाधव वय ३४ वर्षे रा. हॅप्पी कॉलनी, लेन नंबर-३, गोसावी वस्ती, कोथरुड पुणे. हा पोलीसांच्या रेकॉर्डवरिल गुन्हेगार आहे.
      सदरची कामगिरी ही  अप्पर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे  नामदेव चव्हाण, व पोलीस उप आयुक्त,परिमंडळ ५ पुणे शहर श्रीमती नम्रता पाटील, यांचे मागदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे,  बजरंग देसाई,  अरविंद गोकुळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर,  दिगंगर शिंदे,पोनि. (गुन्हे)  विश्वास डगळे, पोनि (गुन्हे) यांचे सुचनाप्रमाणे तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे, पोलीस उप निरीक्षक अविनाश शिंदे, पोलीस अंमलदार, सुशील लोणकर, अविनाश गोसावी, संदीप राठोड, सचिन जाधव, समिर पांडुळे, शाहीद शेख, प्रशांत दुधाळ, निखील पवार, प्रशांत टोणपे, सचिन गोरखे, सुरज कुंभार, भगवान हंबर्डे, अनिरूध्द सोनवणे, अतुल पंधरकर यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!