सुनील भंडारे पाटील
शक्तिपीठ, धर्मपीठ, प्रेरणा पीठ, बलिदान पीठ श्री क्षेत्र वढु बुद्रुक (तालुका शिरूर) येथे आज धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या समाधी स्थळी त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने सालाबाद प्रमाणे भव्य दिव्य दीपोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या शुभहस्ते पहिला दिवा पेटून या कार्यक्रमाचे सुरुवात झाली. यावेळी पंचक्रोशीतील अनेक गावातील शंभूभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्यावतीने सालाबाद प्रमाणे दीपोत्सव साजरा करण्यात येतो.यावेळी असंख्य महिला भगिनी ,धारकरी व वढू बुद्रुक ग्रामपंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते.
सहाय्यक पोलीस निरीक्षक वैभव पवार, पोलीस हवालदार गरुड व पोलीस हवालदार संदीप कारंडे, पोलीस नाईक विकास मोरे ,पोलीस पाटील जयसिंग भंडारे. यांच्या हस्ते पहिला दिवा प्रज्वलित करण्यात आला, फटाक्यांची भव्य आतशबाजी यावेळी समाधी स्थळी केली गेली व लेझर शो केला गेला. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त करण्यात आलेल्या दीपोत्सवामुळे समाधी स्थळ दिव्यांनी झळाळुन गेले होते, सुमारे 2100 दिव्यांची प्रज्वलन करण्यात आल्याचे शिवप्रतिष्ठांच्या धारकऱ्यांनी सांगितले,