सुनील भंडारे पाटील
सणसवाडी (तालुका शिरूर) येथे 9 जणांच्या टोळक्याने लोखंडी रॉड, आणि कुऱ्हाडीने मारहाण करत एका 27 वर्षीय युवकाचा खून केला, याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये 9 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत,
या घटनेबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गोपाळ महादेव लडकर (वय 27 वर्ष, राहणार आरंभ प्रॉपर्टीज सणसवाडी, ता शिरूर जि पुणे ) असे या हल्ल्यात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे, या घटनेत लडकर याचा मामा जखमी झाला आहे, या संदर्भात दिगंबर काळे यांनी शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्यादी दिली आहे, सणसवाडी गावामध्ये दोन गटात भांडण चाललेले असताना शेजारून जात असताना गोपाल लूडकर याला दगड लागल्याचे निमित्त झाले, लूडकर यांने मामा दिगंबर काळे यांना फोन करून बोलावून घेतले, घटनास्थळी येऊन दिगंबर हे भाचा गोपाळ याला घेऊन जात असताना अचानक तीन दुचाकी आल्या, त्यावर आलेल्या 9 जणांनी आमच्या मुलांना का मारले असा जाब विचारला, आणि हातातील लोखंडी रॉड, कुऱ्हाडीने गोपाळला मारण्यास सुरुवात केली, तसेच मामा दिगंबर काळे यालाही मारहाण केली, याप्रसंगी गोपाळला जास्त मारहाण झाल्याने, व गंभीर जखमी झाल्याने, उपचारासाठी पुणे शहरात नेत असताना दरम्यानच्या काळात त्याचा मृत्यू झाला, छोट्याशा कारणावरून सणसवाडीत एकाचा जीव गेल्याने, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे, पुढील तपास शिक्रापूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल खटावकर करीत आहेत,