सुनील भंडारे पाटील
बृहन्मुंबई महानगरपालिका के /पूर्व विभाग अंधेरी पूर्व मुंबई मधील कार्यकारी अभियंता 50 लाखांची लाच घेताना रंगेहात अँटी करप्शन च्या जाळ्यात,
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग बृहन्मुंबई विभाग मुंबई गुन्हा रजिस्टर नंबर 41/ 2022 कलम 7 नुसार 50 लाखांची लाच स्वीकारल्या प्रकरणी लोकसेवक सतीश विश्वनाथ पोवार (वय 57) वर्ग 1 पद कार्यकारी अभियंता बृहन्मुंबई महानगरपालिका के /पूर्व विभाग अंधेरी पूर्व मुंबई याच्यावर गुन्हा दाखल केला असून, फिर्यादी हे काम करीत असलेल्या कंपनीच्या परिसरात शेड अनधिकृत असले बाबत 50 लाखांची लाच मागितले प्रकरणी अँटी करप्शन ब्युरो मुंबई यांच्याकडे तक्रार प्राप्त झाली होती,
त्यानुसार कार्यकारी अभियंता यांच्याकडून फिर्यादी यांच्या कंपनीला नोटीस प्राप्त झाली होती त्याबात फिर्यादी यांनी कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात उत्तरही सादर केले होते, त्यानंतर बृहन मुंबई महानगरपालिका के पूर्व अंधेरी पूर्व विभागातील मनपा कर्मचारी व अधिकारी यांनी फिर्यादी यांच्या कंपनीच्या परिसरामध्ये येऊन कारवाई करण्यास सुरुवात केली, त्याप्रसंगी फिर्यादी यांनी पोवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कार्यालयात भेटण्यास बोलावून सदरची कारवाई थांबवण्यासाठी फिर्यादी कडे 50 लाख रुपये लाचेची मागणी केली, फिर्यादी यांना लाच देण्याची इच्छा नसल्यामुळे त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई यांच्याकडे प्रत्यक्ष येऊन लेखी तक्रार दिली, तक्रारीच्या पडताळणीनंतर सापळा कारवाईदरम्यान पवार यांनी 50 लाख रुपये लाच मागून ती स्वीकारत असताना लाच लुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई यांनी रंग हात पकडले,
सदरची कारवाई अप्पर पोलीस आयुक्त ला प्र वी मुंबई विजय पाटील, यांचे मार्गदर्शनाखाली पथकाने केली