सुनील भंडारे पाटील
शिरूर तालुक्यात शेती क्षेत्रामध्ये महत्त्वाचा समजला जाणारा घोडगंगा साखर कारखाना, या साखर कारखान्याची संचालक मंडळाची निवडणूक नुकतीच पार पडली, त्यानंतर आज कारखान्याच्या चेअरमन पदी ऋषिराज अशोक (बाप्पू) पवार तर व्हॉइस चेअरमनपदी पोपटराव रामदास भुजबळ यांची बिनविरोध निवड करण्यात आली,
शिरूर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचा महत्त्वाचा कणा समजला जाणारा, तसेच शेतकऱ्यांचे हृदय असलेला घोडगंगा साखर कारखाना शिरूर हवेली चे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांचे वडील रावसाहेब दादा पवार यांच्या संकल्पनेतून साकारलेला असून, तालुक्यातून सुमारे 18000 शेतकरी सभासद यांच्या निधीमधून 25 वर्षांपूर्वी उभ्या राहिलेल्या कारखान्यावर पूर्वीपासून आमदार पवार यांची सत्ता आहे, नुकत्याच झालेल्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये 21 जागांपैकी 20 जागा जिंकून शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून आमदार पवार यांनी विरोधकांना धूळ चारली, विरोधकांना फक्त एकच जागा मिळून पराभव पत्करावा लागला,
तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात ऊस बागायत क्षेत्र असून घोडगंगा सहकारी साखर कारखाना ही शेतकऱ्यांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाची सहकारी संस्था आहे, या संस्थेवर राष्ट्रवादी पुरस्कृत शिरूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांच्या नेतृत्वाखाली, तालुक्यातील त्यांचे सहकारी, नियोजन समितीचे पंडित आप्पा दरेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे राजेंद्र नरवडे, प्रकाश पवार, सभापती मोनिकाताई हरगुडे इतर अनेक पदाधिकारी यांच्या नियोजनातून निवडणुकीत एक हाती सत्ता आली आहे,