आळंदी प्रतिनिधी
आळंदी कार्तिक वारीला दिनांक 17 पासून सुरुवात होत आहे, या संजीवन समाधी सोहळ्यात आळंदी पोलीस यांच्याकडून ग्रामस्थ तसेच भाविकांना पास घेऊन वाहनांना प्रवेशाची मुभा देण्यात येत आहे,
त्या संदर्भात आळंदीचे एपीआय सुनील गोडसे यांनी आवाहन केल्यामुळे आळंदी पोलीस स्टेशनमध्ये ग्रामस्थ आणि भाविकांनी अर्ज करत वाहन पासाची मागणी केलेली आहे, भाविकांसाठी पिवळ्या तर ग्रामस्थांसाठी गुलाबी रंगाच्या पासाची व्यवस्था आळंदी पोलिसांकडून करण्यात आलेली आहे ,जागतिक महामारीनंतर मोठ्या प्रमाणात भरणाऱ्या या वारीमुळे पोलीस यंत्रणेवर याबाबत मोठा ताण असनार आहे, मागील आषाढी वारीच्या वेळी पोलिसांकडून ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागला होता,आधार कार्ड पाहून सोडण्याची विनंती करण्यात आलेली असताना सुद्धा बऱ्याच लोकांना ,पदाधिकाऱ्यांना, पोलिसांनी अडवणूक करून आळंदीत प्रवेश करू दिला नाही, शासकीय कर्मचारी सुद्धा यातून सुटले नाहीत,त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता, कार्तिकी वारीचे वेळी केवळ अत्यावश्यक सेवा म्हणून काही वाहनाना, शासकीय वाहनांना प्रवेशास मुभा आहे,दिनांक 17 ते दिनांक 23 पर्यंत कुठल्याही प्रकारची वाहने रस्त्यावर आणू नयेत असे आळंदी पोलिसांकडून आवाहन करण्यात आलेले आहे, त्याचबरोबर सुनील गोडसे यांनी आळंदी पोलिसांच्या वतीने ग्रामस्थ यांना आपली वाहने सुरक्षित ठिकाणी पार्क करावी, आणि यात्रा काळात रस्त्यावर वाहने आणू नये, याबाबत सहकार्य करण्याचे आवाहन केलेले आहे, ग्रामस्थांनी आणि भाविकांनी मोठ्या प्रमाणात पास साठी आळंदी पोलीस स्टेशनमध्ये गर्दी केली होती दिनांक २० ला कार्तिकी एकादशी आहे तसेच 17 ,18 ,19 ,20 ,या काळात यात्रा भरणार असून 22 तारखेला समाधी सोहळा होणार आहे दिनांक 23 तारखेपर्यंत सर्व वाहनांना बंदी करण्यात आलेली आहे,