ढगेवाडी कान्हूर मेसाई भागातील बिबट्या वनविभागाच्या पिंजऱ्यात - परीसरात समाधान

Bharari News
0
सणसवाडी प्रतिनिधी ज्ञानेश्वर मिडगुले
      ढगेवाडी मांदळवाडी (तालुका शिरूर)  परीसरात शेतमजुरावर मागील महिण्यात बिबट्याने हल्ले करून जबर जखमी केल्याने सविंदणे कान्हूर मेसाई परीसरात बिबट्याची दहशत पसरली होती,
व सविंदणे मांदळवाडी ग्रामस्थांनी वनविभागाकडे पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करणेची मागणी केलेने वनविभागातर्फे दि २९ रोजी ढगेवाडी परीसरात पिंजरा लावणेत आला होता . त्यावर दोन दिवसानी त्या पिंजऱ्या मध्ये बिबट्या अडकला व भितीचे वातावरण कमी झालेने परीसरातील नागरीकांनी वनखात्याचे आभार मानले . पिंजऱ्यात अडकलेल्या वाघाला पहायला येणाऱ्यांची संख्या व त्यांचे वाघाला बाहेरून चिडवणे प्रकाराने बिबट्या गुरगुरत होता . बनविभागाने बिबट्याचा बंदोबस्त केल्याने लोकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे .
पिंज-यातल्या बिबट्याला चिडवायचा वगैरे बालीश प्रकार कुणी थांबवला नाही हे दुःख द आहे.  तो घाबरलेला आणि ऊपाशी असू शकतो.  माणसाची ही विकृती समजु शकत नाही.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!