गुनाट प्रतिनिधी
हवेली तालुक्यातील पिंपरी सांडस येथील कै.राजेंद्र दामोदर लोखंडे यांच्या दशक्रिया विधीच्या वेळी यांच्या कुटुंबियाला लाखो रुपयांची मदत ग्रामस्थांकडून करण्यात आली पिंपरी सांडस या गावांमध्ये राहत असलेले तसेच ज्यांनी वीस वर्षे ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी म्हणून गावची सेवा केली सर्वांशी मनमिळाऊ स्वभाव ठेऊन माणसे कमावली, वाद-विवाद न करता आपल्या पाणीपुरवठा कर्मचारी पदाचा भार ज्यांनी इमानदारीने कमावला असे लोहार समाजाचे कै. राजेंद्र दामोदर लोखंडे यांचे (दि.६ ) वार-रविवार रोजी अकस्मित असे दुःखद निधन झाले.
यावेळी पिंपरी सांडस गावातील प्रत्येक नागरिकांनी आपले कुटुंब या नात्याने त्या कुटुंबाची सांत्वन केली. कुटुंबातील कर्ता माणसाची निधन वार्ता झाल्यामुळे
दशक्रिया विधी वेळी प्रवचन संपल्यानंतर आपल्या श्रद्धांजली पर भाषणामध्ये प्रत्येक वक्त्यांनी या कुटुंबियाला आर्थिक स्वरूपाची मदत आहे असे आव्हान केले त्या आव्हानाला प्रतिसादाला मदत म्हणुन लाखो रुपयांची मदत झाली ही मदत त्यांच्या कुटुंबियांकडे सुपुर्त करण्यात आली तसेच ते काम करत असलेल्या जागेवरती त्यांच्या मुलाला कायम करून घेण्याचे आश्वासन ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आले सर्वात शेवटी दशक्रिया विधीच्या निमित्ताने उपस्थित सर्वांचे लोखंडे कुटुंबीयांनकडून ऋण व्यक्त करण्यात आले.